विरोधक आरोप करीत राहिले... देवीदास पिंगळेंनी त्यांना उमेदवारही मिळू दिले नाही

पेठ येथे झालेल्या कार्यक्रमात पॅनेलचे देवीदास पिंगळे यांना बिरसा मुंडा यांची मूर्ती भेट देण्यात आली.
Devidas Pingle & Other leaders
Devidas Pingle & Other leadersSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली असली तरी खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरवात झाली आहे. बुधवारी सत्ताधारी देवीदास पिंगळे (Devidas Pingle) गटाने हक्काचे मतदान असलेल्या हरसूल येथे सहविचार सभा आयोजित करून ‘आपला पॅनल’ ची घोषणा केली. त्यामुळे विरोधक आरोप करीत राहीले आणि पिंगळे यांनी त्यांना उमेदवारही मिळू दिले नाही अशी स्थिती होते की काय असे चित्र आहे.

Devidas Pingle & Other leaders
महाराष्ट्राचा यूपी, बिहार झाला की काय? असे वाटायला लागले आहे!

यावेळी श्री. पिंगळे यांनी आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते एकप्रकारे प्रचाराचा नारळ फोडून सर्वांनाच धक्का दिला आहे. या वेळी पेठ, हरसूलवासीयांनी विद्यमान सभापती देवीदास पिंगळे यांना बिरसा मुंडा यांची मूर्ती भेट देत या भागातील जनाधार हा पिंगळे गटाच्याच पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचाही शब्द दिला आहे.

Devidas Pingle & Other leaders
धक्कादायक, भाजपच्या सत्तेत कचऱ्यात दरमहा ९० लाखांचा भ्रष्टाचार!, पैसा जातो कुठे?

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी खासदार व बाजार समितीचे सभापती श्री. पिंगळे म्हणाले, नाशिक बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे. सहविचार सभेस उपस्थितांची गर्दी व पेठ हरसूल सदस्य व सभासदांनी दाखविलेला विश्वास व आपला पॅनलला दिलेला एकमुखी पाठिंब्यामुळे पुढील काळात सदैव शेतकरी हिताची कामे करीन. विरोधकांनी काही काळ सत्तेत आल्यावर बाजार समिती व शेतकऱ्यांचे किती नुकसान केले हे जनतेने पाहिले आहे. केवळ दादागिरी, दहशत व भ्रष्टाचार हा विरोधकांचा अजेंडा आहे. मात्र शेतकरी त्याचा जवळ करीत नाहीत, हे दिसून आले आहे.

या सभेस संचालक संपतराव सकाळे, बहिरू पाटील मुळाणे, पुंडलिक साबळे, भिका पाटील महाले, मनोहर चौधरी, भास्करराव गावित, नामदेव हलकांदर, समधान बोडके, मुख्तार सय्यद, देविदास जाधव, मिथुन राऊत, दामोदर राऊत, रामदास वाघेरे, अरुण काशीद, हरिभाऊ बोडके, बाळासाहेब म्हस्के, विलास कड, विलास कांडेकर, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, रवींद्र भोये, संजय तुंगार, विश्वास नागरे, विनायक माळेकर, युवराज कोठुळे, विष्णूपंत म्हैसधुणे, नामदेव गायकर, अर्जुन मौले, मधुकर पाखणे, मंगळू निंबारे, गोकुळ बट्टासे, पेठ हरसूल येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.

देविदास पिंगळे यांच्या पॅनलमध्ये काम करण्याची यापूर्वीदेखील मला इच्छा होती. परंतु, मला काही लोक येऊ देत नव्हते. आता मात्र,देविदास पिंगळे यांच्यासारखा संयमी आणि विकास साधणाऱ्या नेत्यांसोबत आपण काम करणार आहोत.

- संपतराव सकाळे, संचालक तथा माजी सभापती

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com