Nashik Politics: धक्कादायक, खड्ड्यांनी घेतले चार बळी, मग लोकांनीच नाशिक महापालिकेची अब्रू वेशीवर टांगली...

Opposition party, MLA Warning ignored by NMC, Angry Citizens protest on Dindori Road-खड्डयांनी घेतले चार बळी, शेकडो संतप्त नागरिकांनी उस्फूर्त आंदोलन करताच प्रशासनाची झाली धावपळ!
Public Agitation on pits
Public Agitation on pitsSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: नाशिक महापालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे अनेक अल्टीमेटम दिले. मात्र त्यातील एकाचेही पालन झाले नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या अकार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नाशिक शहरातील खड्डे बुजविण्यावर महापालिका कोट्यावधींचा खर्च करते. एकीकडे खड्डे बुजविण्याचा महापालिकेचा दावा केला जातो. दुसरीकडे कागदावर वाढलेले खड्डे अशी स्थिती आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये ओतूनही रस्त्यांवरील खड्ड्यांची स्थिती सुधारलेली नाही.

शहरातील खड्डे व रस्त्यांच्या प्रश्नावर महापालिकेचे लक्ष वेधण्याासठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने सोशल मीडियावर मोठे आंदोलन केले. आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदने दिली. शहरातील सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी आंदोलन करीत इशारा दिला.

Public Agitation on pits
Sushma Andhare Politics: सुषमा अंधारे यांचे एकनाथ शिंदेंना सणसणीत उत्तर, म्हणाल्या...ती ‘गर्दी भाडोत्री’

या सर्व आंदोलनांचा काहीही परिणाम झाला नाही. दिंडोरी रोड परिसरात रस्त्यांवरील खड्ड्यांनी चार युवकांचे बळी घेतले. रोज रस्त्यांवरील खड्डे धोकादायक होत आहेत. महापालिका मात्र खड्डे बुजविण्याचा दावा करते. त्यावर कोट्यावधींचा खर्चही करते, असा विरोधा भास आहे.

Public Agitation on pits
Devendra Fadnavis : '80 दिवस संघर्ष', फडणवीसांच्या दरबारातही न्याय नाही ; 'त्या' आंदोलकांनी आता कुठे जायचं?

शहरातील दिंडोरी रोड, रासबिहारी शाळेच्या परिसरात धोकादायक खड्ड्यांमुळे अपघात झाले. त्यात परिसरातील चार युवकांना प्राण गमवावे लागले. त्यानंतरही स्थिती न सुधारल्याने आज परिसरातील महिला, नागरिकांनी चक्क सोशल मीडियावर आवाहनकरीत आंदोलन केले.

सत्ताधारी भाजपचे आमदार, विरोधी पक्ष, शिवसेनेच्या आंदोलनानंतर देखील काहीच फऱक पडला नाही. त्यामुळे आज नागरिकांनी उस्फूर्तपणे रस्त्यावर उतरत आंदोलन केले. थेट रस्ता रोको झाला. त्यामुळे प्रशासनाची अक्षरशः धावपळ उडाली.

यावेळी सुनील निरगुडे, रवी गायकवाड, राजू देसले, विशाल कदम, योगेश कापसे, प्रवीण जाधव, आदींसह मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला या आंदोलनात उतरल्या होत्या. त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. चार युवकांचा बळी घेतल्यानंतर देखील महापालिका जागी होत नसल्याने निषेध करण्यात आला.

या भागातून गुजरातला जाणारा महामार्ग, मुंबई आग्रा महामार्ग व शहरातील अशा तिन्ही प्रकारची अवजड वाहतूक होते. त्यामुळे सगळ्यांचीच मोठी गैरसोय होते. त्यात अपघात नित्याचे झालेत. आता थेट नागरिकांचे बळी जाऊ लागले आहेत. त्यामुळे तासभर नागरिकांनी मुख्य चौकातच रस्ता रोखला. त्यांच्या भवाना व मागण्याची दखल आता तरी महापालिका घेते का? याची उत्सुकता आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com