Vikhe Patil Warning : थोरातांच्या गावातून विखेंचा वाळूतस्करांना दणका; प्रवरेतील वाळूउपशाच्या चौकशीचा रोख कोणाकडे?

भंडारदरा धरण ते ओझरपर्यंत प्रवरा नदीपात्राची नोंद ही कालवा म्‍हणून होती तर यापुर्वी त्‍यातून वाळू उपसा कसा झाला याची चौकशी प्रांताधिकारी आणि पोलिस अधिक्षकांनी करावी
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Nagar News : राज्‍यातील वाळू धोरणातील त्रूटी दूर करण्‍याचा प्रयत्‍न आहे. पण, धोरणच यशस्‍वी होऊ द्यायचे नाही, यासाठी प्रयत्‍न करणाऱ्यांचे मनसुबे सरकार कदापी यशस्‍वी होऊ देणार नाही, असा सूचक इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांच्या जोर्वे गावात एका कार्यक्रमात दिला. विशेष म्हणजे ओझरपर्यंत प्रवरा नदीला कालवा दाखवून झालेल्या वाळू उपशाची चौकशी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि विभागाच्या प्रांतांनी करावी, असेही विखे म्हणाले आहेत. (Order of Radhakrishna Vikhe Patil to inquire into sand stolen in river Pravara)

संगमनेर तालुक्‍यातील जोर्वे येथे भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या महाजनसंपर्क अभियानात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी उपस्थित शेतकरी, ग्रामस्‍थ आणि युवकांशी संवाद साधून केंद्र व राज्‍य सरकारच्‍या योजनांची माहिती दिली. त्यावेळी विखे यांनी महसूलमंत्री या नात्याने राजकीय विरोधकांचे कान टोचले.

Radhakrishna Vikhe Patil
Sakal-Saam Survey : मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना सर्वाधिक पसंती;पण उद्धव ठाकरेंना मोठी सहानुभूती, दुसऱ्या स्थानावर झेप

भंडारदरा धरणापासून ओझरपर्यंत प्रवरा नदीपात्राची नोंद ही कालवा म्‍हणून होती. यापूर्वी त्‍यातून वाळूउपसा कसा झाला, असा प्रश्न विखे यांनी उपस्थित करत याची चौकशी प्रांताधिकारी आणि पोलिस अधिक्षकांनी करावी, असे सांगितले. आता दिवसा वाळू मिळत आहे, याची पोटदुखी अनेकांना झाली आहे, तेच आता नदीपात्रातून वाळू उपसा होऊ देणार नाही; म्‍हणून पुढाकार घेऊ लागले आहेत, याचे आश्‍चर्य वाटते, असा टोमणा विखे यांनी संगमनेर तालुक्यातील नेत्यांना लगावला.

Radhakrishna Vikhe Patil
Sakal-Saam survey : भाजपला सर्वाधिक २६.८ टक्के लोकांचा कौल; पण अजितदादांच्या बंडानंतरही शरद पवार गटाला १५ टक्के जनतेची पसंती

यापूर्वी वाळू उपशाला विरोध करणाऱ्यांवर या तालुक्‍यात गुन्‍हे दाखल झाले; परंतु वाळूमाफीया मात्र मोकाटच फिरत होते, ही परिस्थिती बदलविण्‍याचा प्रयत्‍न आपण वाळू धोरणातून केला असल्‍याचे विखे यांनी सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil
Ajit Pawar Group News : अजित पवार गटाने बोलावली बैठक, पक्षप्रतोद अनिल पाटील बजावणार व्हीप; पवारांसोबतच्या आमदारांकडे लक्ष

राधाकृष्ण विखे पाटील महसूलमंत्री आहेत, हेच खाते २०१९ मध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे होते. नगर जिल्ह्यातील विखे-थोरात यांच्यात राजकीय विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रूत आहे. विशेष म्हणजे थोरात-विखे यांचे विधानसभा मतदारसंघही शेजारी-शेजारी आहेत. संगमनेर तालुक्यातील थोरातांचे मूळगाव जोर्वेसह काही गावे विखे यांच्या राहाता मतदारसंघात आहेत. या पार्श्वभूमीवर कधी विखे संगमनेर तालुक्यात, तर थोरात विखेंच्या राहाता-कोपरगाव तालुक्यात येत राजकीय हस्तक्षेप, विविध कारणांचा आधार घेत कायम ठेवत आरोप-प्रत्यारोप करतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com