RPI (A) Politics: राज्यमंत्री रामदास आठवले अडचणीत, पक्षाचा नेताच कुंटणखाण्याचा मास्टर माईंड?

Pavan kshirsagar; The RPI leader was running a sex racket and brothel-उच्चभ्रू वस्तीत कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह आरपीआय नेता पवन क्षीरसागर याला अटक
Pavan Kshirsagar RPI
Pavan Kshirsagar RPISarkarnama
Published on
Updated on

Sex racket News: सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्याने महाराष्ट्र हादरला आहे. अशातच नाशिकमध्ये उच्चभ्रवस्तीत राजकीय नेत्याचाच कुंटणखाना असल्याचे उघड झाले आहे. त्यात दोन युवतींना डांबून ठेवण्यात आले होते.

संबंधित इमारतीतील जागरूक नागरिकांमुळे पोलिसांना ही कारवाई करावी लागली. येथील रहिवासीयांना त्याचा प्रचंड त्रास होत होता. दोन दिवसांपूर्वी शहरातील आडगाव नाका भागातील उच्चभ्रू वस्तीत कुंटणखाना सुरू असल्याचे आढळले होते.

याबाबत पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारीवरून कारवाई केली. मात्र ताब्यात घेतलेल्या कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेला अवघ्या दोन तासातच पोलिसांनी सोडून दिले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर नागरिक संतप्त झाले होते.

पोलिसांकडून तक्रार करणाऱ्यांना सहकार्य करण्याऐवजी कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेविषयी सहानुभूतीच व्यक्त होत असल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित इमारतीतील महिला एकत्र येत त्यांनी थेट पोलीस आयुक्तांचे कार्यालय गाठले होते.

Pavan Kshirsagar RPI
Rajabhau Waje Politics: खासदार वाजे संतापले, 'त्या' कामाचे १९.४२ कोटी गेले कुठे?

या सर्व महिलांच्या तक्रारीनंतर पोलीस खडबडून जागे झाले. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात आली. संबंधित कुंटणखाण्यात डांबून ठेवलेल्या दोन युवतींचीही सुटका करण्यात आली. पोलिसांनी चौकशी केली असता, कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख पवन क्षीरसागर हे त्याचे सूत्रधार असल्याचे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी क्षीरसागर यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यभर महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. नाशिक शहरातही अशा घटना वाढल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार अडचणीत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सत्ताधारी पक्ष व केंद्रात राज्यमंत्री असलेल्या नेत्याचा निकटवर्तीयच मास्टरमाईंड निघाता.

याच वेळी शहरात उच्चभ्रवस्तीत थेट कुंटणखाना चालविण्याची हिंमत राजकीय नेत्यांमध्ये कुठून आली अशी चर्चा सुरू झाली आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या सत्ताधारी पक्षाकडूनच असे प्रकार होत असल्याने नागरिकांना धक्का बसला आहे.

Pavan Kshirsagar RPI
Balasaheb Thorat Vs Devendra Fadnavis : फडणवीस चक्रव्युहात कसे अडकले; थोरात म्हणाले, 'नको ते उद्योग केले'

संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता त्यांनी याबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता संबंधित राजकीय पक्ष आणि केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री आठवले याबाबत काय भूमिका घेतात याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com