PFI News: काय आहे ‘पीएफआय’चे देशविघातक ‘मॉडेल २०४७’?

‘एटीएस’कडून न्यायालयात जप्त हार्डडिक्समध्ये देशविघातक माहिती असल्याचा दावा.
PFI Activists in Nashik Court
PFI Activists in Nashik CourtSarkarnama

नाशिक : देशविघातक कारवाया (Anti National activity) आणि समाजात अशांतता निर्माण करीत असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या ‘पीएफआय’च्या (PFI) पाचही संशयितांच्या चौकशीतून गंभीर माहिती समोर आल्याचा दावा राज्य दहशतविरोधी पथकाने (एटीएस) केला आहे. (PFI organisation`s model 2047 is for india is shocking)

PFI Activists in Nashik Court
ईडीने काँग्रेस भोवतीचा फास आवळला; पाच नेत्यांना समन्स…

मालेगावातून अटक करण्यात आलेला मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी याने फायरिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट आणि हैदराबाद येथील दुहेरी ब्लास्ट प्रकरणाशीही या संघटनेचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे समोर येत आहेत.

PFI Activists in Nashik Court
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांचा 'भाव' वधारला

`पीएफआय’च्या संशयितांकडून जप्त करण्यात आलेली हार्डडिक्स व महत्त्वाची कागदपत्रे एटीएस अधिकाऱ्यांच्या हाती ‘मॉडेल २०४७’ लागले आहे. यात भारत देश ‘मॉडेल २०४७’ मध्ये कसा असेल, यासंदर्भात संशयास्पद माहिती आहे. या माहितीच्या आधारे एटीएस व देशपातळीवरील राष्ट्रीय तपास यंत्रणा कसून तपास करीत आहे. यातून देशविघातक माहिती समोर येण्याची दाट शक्यता आणि भीतीही सरकारी पक्षाने युक्तिवाद करताना व्यक्त केली.

संशयितांच्या बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली असून, यामागे परकीय हात असण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. संशयितांकडून जप्त करण्यात आलेल्या हार्डडिक्समधील माहिती अत्यंत देशविघातक असल्याचीही भीती न्यायालयात व्यक्त करण्यात आली आहे. या सर्वांचा कसून शोध घेण्यासाठी ‘एटीएस’च्या मागणीनुसार, ‘पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया’च्या पाचही संशयितांना नाशिक जिल्हा न्यायालयाने १७ ऑक्टोबरपर्यंत १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

तपासाबाबत न्यायालयाला माहिती

राज्य ‘एटीएस’ने गेल्या २२ सप्टेंबरला पहाटे देशभरात ‘पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया’च्या संशयित पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा व ‘ईडी’च्या निर्देशानुसार दहशतवादविरोधी पथकांनी छापे टाकत अटक केली होती. यात नाशिक दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मालेगावातून मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी याच्यासह पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख, रझी अहमद खान, बीडमधून वसीम अझीम ऊर्फ मुन्ना शेख, कोल्हापुरातून मौला नसीसाब मुल्ला या पाच जणांना अटक केली होती. त्यांच्या कोठडीची मुदत सोमवारी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले. त्या वेळी सरकारी पक्षातर्फे न्यायालयात १२ दिवसांतील तपासाची माहिती देण्यात आली.

देशविघातक माहितीची कागदपत्रे

तपास पथकाने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार पाचही संशयित एकमेकांच्या संपर्कात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यात झालेले संवाद आक्षेपार्ह आहेत. त्यांच्या संवादातील आवाजाचे नमुने फॉरेन्सिक एजन्सीकडे चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पाचपैकी काही संशयितांनी दुबई, सौदी अरेबिया आदी आखाती देशांचे दौरे केले आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यातील मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार देशविघातक कागदपत्रे सापडले आहेत. याबाबतची महत्त्वाची कागदपत्रेही न्यायालयासमोर सादर केल्यानंतर त्यावर सरकारी पक्षाने भाष्य करणे टाळले. विशेष सरकारी वकील तथा जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांच्या युक्तिवादानंतर संशयितांनी त्यांच्याकडील जप्त करण्यात आलेले मोबाईल, लॅपटॉपची मागणी केली असता, न्यायालयाने ती फेटाळून लावत संशयितांच्या कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत १४ दिवसांची वाढ करण्यात आली.

मौलानाला फायरिंगचे प्रशिक्षण

मालेगाव येथून अटक केलेले मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी ‘पीएफआय’चे नाशिक जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र, मौलाना असतानाही त्यांनी फायरिंगचे प्रशिक्षण घेतलेले असल्याचे ‘एटीएस’च्या तपासातून समोर आले आहे. याबाबत सरकारी पक्षातर्फे प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पाचही संशयितांच्या बँक व्यवहाराची माहिती घेण्यात आली असून, त्यात मोठ्या प्रमाणात फंडिंग झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही हे फंडिंग होत असल्याचाही संशय व्यक्त होत आहे.

जर्मन बेकरी ब्लास्टशी कनेक्शन

पुण्यातील जर्मन बेकरी ब्लास्ट प्रकरणातील फरारी असलेल्या संशयितांशी ‘पीएफआय’च्या या संशयितांचा संबंध असल्याचे पुरावे ‘एटीएस’च्या हाती लागले आहेत. त्याचप्रमाणे हैदराबाद येथील दुहेरी ब्लास्ट प्रकरणातील फाशीवर गेलेल्या आरोपीशीही या संशयितांचे कनेक्शन असल्याचे तपासात समोर आल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. याशिवाय महत्त्वाची गोपनीय कागदपत्रे व सोशल मीडियावर असलेल्या संशयितांच्या संवादावरून देशाच्या एकात्मतेवरच हल्ला असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला.

अटकेतील पाच संशयित

मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (२६, रा. हुडको कॉलनी, कुसुंबा रोड, मालेगाव, जि. नाशिक), अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (४८, रा. साहिल सर्वदा सोसायटी, कोंढवा, पुणे), रझी अहमद खान (३१, रा. आशोका म्युज, कोंढवा, पुणे), वसीम अझीम ऊर्फ मुन्ना शेख (२९, रा. माळी गल्लीजवळ, अझीज पुरा, बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. साहिल अपार्टमेंट, सिरात मोहल्ला, सुभाषनगर, कोल्हापूर))

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com