राहुल गांधींच्या धास्तीनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ!

राहुल गांधीवरील बनावट कारवाईच्या निषेधार्थ मोदी सरकारविरोधात जळगाव येथे टॉवर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
Congress Workers agitation at Jalgaon
Congress Workers agitation at JalgaonSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : कॉंग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देशहीतासाठी केंद्र सरकारला (Centre Government) प्रश्न करतात. त्याची उत्तरे त्यांच्याकडे नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची झोप उडाली आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांना वारंवार ईडीतर्फे चौकशीस बोलावून त्यांना त्रास दिला जात आहे. त्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे बुधवारी केंद्रातील मोदी सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. (Congress agitation against Centre Government`s revenge on Rahul Gandhi)

Congress Workers agitation at Jalgaon
खबरदार... कायदा हातात घ्याल तर!

कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष श्‍याम तायडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. टॉवर चौकात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात घोषणा देऊन निषेध केला.

Congress Workers agitation at Jalgaon
राहुल गांधीवरील सूडबुद्दीच्या कारवाईला जनता चोख उत्तर देईल

याबाबत शहराध्यक्ष श्‍याम तायडे यांनी म्हटले आहे, की नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासन काळात ईडीने चौकशी करून क्लीन चीट दिली होती. असे असतानाही आपले अपयश झाकण्यासाठी व देशभरातील महागाई, बेरोजगारी, जातीय तेढ यावरून आवाज उठविणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर दबाव टाकण्यासाठी त्यांची वारंवार ईडीमार्फत चौकशी करून त्रास देण्यात येत आहे.

केंद्रातील मोदी सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत. केंद्रातील सरकारने हे थांबविले नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी या वेली दिला.

युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, सरचिटणीस जगदीश गाढे, सखाराम मोरे, अमजद पठाण, जाकीर बागवान, सागर सपके, सुरेंद्र कोल्हे, गोकुळ चव्हाण, मालोजी पाटील, संतोष गायकवाड, दीपक सोनवणे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com