आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ गौहर रझा विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटक

४ व ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संमेलन नाशिक येथे होत आहे.
Poet Gauhar Raza
Poet Gauhar RazaSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : ४ व ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ तसेच दिल्ली येथील कवी गौहर रझा (Gauhar Raza) यांच्या हस्ते होणार आहे. त्यांचे आई वडील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचे वडिल शिक्षण तज्ञ, कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य, त्याचबरोबर विज्ञानाचे शिक्षक होते.

Poet Gauhar Raza
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात

गौहर रझा हे व्यवसायाने भारतीय वैज्ञानिक आहेत. आणि एक अनेक प्रमुख उर्दू कवी सामाजिक कार्यकर्ता आणि वृत्तचित्र फिल्म निर्माता आहेत. सामान्य जनतेमध्ये विज्ञानाविषयीची समज वाढवणे आणि लोकप्रिय करणे यासाठी ,म्हणजेच वैज्ञानिक लोक विज्ञानाच्या चळवळीच्या सोबत ते काम करत आहेत . गोहर रसाळ यांचे संपूर्ण कुटुंबच सामाजिक चळवळींमध्ये अग्रेसर राहिलेले आहे. फॅसीझमला बळी पडलेले सफदर हाश्मी हे त्यांचे निकटवर्तीय होते. त्यांनी फुलटायमर असणाऱ्या शबनम हाश्मी यांच्याशी विवाह केलेला आहे. विद्यार्थिदशेपासून डाव्या विद्यार्थी संघटनांच्या उत्तर प्रदेशचा विद्यार्थी संघटना मधले सक्रिय कार्यकर्ते राहिलेल्या आहेत. अलिगड मुस्लिम विद्यापीठ त्यांनी शिक्षण घेतले आहे . त्यांची 'जंगी आजादी ' ही फिल्म राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजली गेली आहे.

Poet Gauhar Raza
साहित्य संमेलन झालेय फडणवीस, पाटील यांभोवती केंद्रित

गौहर रजा यांनी देशभरातल्या अनेक नामवंत अशा विज्ञान इन्स्टिट्यूटमध्ये काम केलेले आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान दिल्ली येथे बिजली उपकरण और सिस्टीम यामध्ये त्यांनी एमटेक केलेले आहे. आणीबाणीच्या काळात ते स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि सचिव होते. मुंबई इलेक्ट्रिक इंजिनिअर म्हणून त्यांनी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यांचा कवितासंग्रह ' जज्बो की लाउ तेज केरों को लहजे की ' हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे.

अंधेरे के दिनो मे एक रोमँटिक कविता लिखने के लिए एक बेबस व्यक्ती की ही कविता गाजलेली आहे. 'सलाम इंडिया ' हे गाणे देखील त्यांनीच लिहिले आहे. समकालीन समस्यांविषयी नेहमी भाष्य करत असतात. देशाच्या भविष्याबाबत अत्यंत मूलगामी चिंतन करणारे विचारवंत म्हणून संपूर्ण भारतीयांना परिचित असणारे शास्त्रज्ञ उद्घाटनासाठी येणार आहेत. त्यामुळे एक नाशिककरांना मोठी वैचारिक मेजवानी या संमेलनाच्या निमित्ताने मिळणार आहे. तरी त्याचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com