Nashik Police News: गेले काही दिवस पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात शहरात मोहीम उघडली आहे. त्याची सर्वत्र चर्चा होऊन गुन्हेगारांत धाक निर्माण झाला आहे. यामध्ये एका सावकाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या वरून चांगलाच गोंधळ झाला.
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी राजकीय आणि अन्य गुन्हेगारांविरुद्ध मोहीम उघडली आहे. ज्यांच्यावर कोणीही हात टाकू शकत नाही, अशा राजकीय नेते व गुन्हेगारांवर कारवाई केली. त्यांच्याकडून "नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला" असे वदवून घेण्यात आले.
मात्र पोलिसांच्या या कारवाईला पोलिसांकडूनच आव्हान मिळाल्याचे दिसले. नाशिक रोडच्या कैलास मैद याला अवैध सावकारी प्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. त्याची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू होती.
अवैध सावकारी च्या माध्यमातून कैलास मैद हा नागरिकांना छळतो. विरोधात विविध तक्रारी आहेत. मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आली नव्हती. त्याच्या विरोधात अवैध सावकारी आणि व्याजाच्या वसुलीसाठी धमकावण्याचे गुन्हे दाखल होते.
त्याच्या विरोधात पुण्यात दोन तर उपनगर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. मात्र श्री मैद याला अद्याप अटक झाली नव्हती. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी संबंधितांना चांगलेच फैलावर घेतले होते.
पोलीस आयुक्त कर्णिक यांनी छापल्यानंतर पोलिसांनी लगेचच मैद याला अटक करण्याची कारवाई केली. मात्र तो पसार झाला. जवळपास शंभर किलोमीटर पाठलाग करून सिनेस्टाईल पद्धतीने त्याला ताब्यात घेण्यात आले होते.
गुन्हे शाखेकडून त्याची चौकशी सुरू होती. त्याचवेळी ग्रामीण पोलिसात अंमलदार असलेल्या सारिका मैद तिथे प्रकट झाली. तिने पोलिसांना कैलास मैद याची चौकशी होऊ देणार नाही. त्याला ताबडतोब सोडा, अशी दमबाजी केली.
एवढ्यावरच न थांबता तिला समजावणाऱ्या हवालदाराला कॉलर पकडून धक्काबुक्की केली. मी फार खतरनाक आहे. तिच्या पोलीस अधीक्षकाची नोकरी खाऊन टाकेल, या शब्दात तिने पोलिसांना धमकावले. सारिका मैद हिच्या कामकाजाविरोधात अनेक तक्रारी आहेत.
त्यानंतर लगेचच मैद हिने काही लोकांना फोन केले. प्रशांत गारमोरे, दीपक किरवे, रवी जाधव, अजय पाटील, नितीन परदेशी, देवा शिशोदे आणि अन्य साथीदारांनीही पोलीस ठाण्यात येऊन चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे पोलीसही काही काळ गांगरून गेले होते.
आयुक्तांना याची माहिती मिळताच त्यांनी कडक कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर पोलिसांबलदार मैद इच्छासह तिच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा अहवाल ग्रामीण पोलिसांना देण्यात येणार आहे. त्यानंतर तिच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
शहरात अवैध सावकारीने डोके वर काढले आहे. नागरिकांकडून अवैध सावकारांनी अवाजवी वसुली करून धमकावणे आणि खंडणी वसुलीचे प्रकार केले आहेत. त्याबाबत कारवाई सुरू असतानाच चक्क महिला पोलिसांनीच या कारवाईला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.