Igatpuri Gram Panchayat : उमेदवारी केल्याने भररस्त्यात मारहाण; गावात वातावरण तंग

Political disputes in Candidates, Police arrests five supporters-घोटी ग्रामपंचायतीच्या मतदानावेळी मतविभागणी होण्याच्या भीतीने दोन गटांत तासभर हाणामारी
Grampanchayat election
Grampanchayat electionSarkarnama
Published on
Updated on

Igatpuri Gram Panchayat Politics : ग्रामपंचायत निवडणुकीत अत्यंत चुरशीची स्थिती आहे. त्यामुळे अडचणीच्या ठरणाऱ्या तसेच मतविभागणी होईल, या भीतीने प्रतिस्पर्धी उमेदवाराला बेदम मारहाण करण्यात आली. तासभर हा राडा सुरू होता. त्यामुळे मतदानाच्या पूर्वसंध्येला तणाव निर्माण झाला. (Gram Panchhayat election, Police arrested five persons in Ghoti)

घारगाव (इगतपुरी) येथे निमोणवाडी भागात 'तू निवडणुकीसाठी उमेदवारी का केली' अशी विचारणा करीत उमेदवार व त्याच्या सहकाऱ्याला मारहाण करण्यात आली. याबाबतची माहिती गावात पसरताच दोन्ही गटाचे समर्थक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यातून दोन्ही गटांत जोरदार हाणामारी सुरू झाली.

Grampanchayat election
Maratha Reservation News : येवल्यातील कार्यकर्ते मशाल घेऊन निघाले रायगडावर!

घारगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान काल रात्री दहाला उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करीत होते. या वेळी उमेदवार तानाजी प्रशांत खातळे घराकडे जात असताना गावातील विरोधकांनी रस्त्यात गाडी आडवी उभी करून त्यांना अडवले.

निवडणुकीसाठी आमच्या विरोधात उमेदवारी का करतो आहेस, असे सांगून मारहाण करण्यास सुरुवात केली. तासभर हा गोंधळ आरडाओरड सुरू होता. याची माहिती घोटी पोलिस ठाण्यात कळताच पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनास्थळी जाऊन त्यात हस्तक्षेप केला, त्यांनी हाणामारी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. सहा लोकांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

आज मतदान सुरू झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. वातावरण निवळले असून, शांततेत मतदान सुरू आहे. पोलिस निरीक्षक विनोद पाटील सहकाऱ्यांसह धारगाव येथे बंदोबस्त देत आहेत.

Grampanchayat election
Asha Pawar: माझ्या मुलानं मुख्यमंत्री व्हावं! अजितदादांच्या मातोश्रींची भावना

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com