Ahmednagar News: नगर जिल्हा बँकेसाठी आजची रात्र महत्वाची; अजितदादा अन् थोरांताची बैठक, अध्यक्षाचे नाव ठरले?

Ahmednagar District Central Cooperative Bank: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग
Ahmednagar District Central Cooperative Bank
Ahmednagar District Central Cooperative BankSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे देखील नगर दौऱ्यावर होते.

यावेळी नवीन अध्यक्ष निवडीबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडाळाशी अजित पवारांनी चर्चा केली. या बैठकीला थोरातही उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीत नवीन अध्यक्षाचे नाव ठरल्याची चर्चा आहे. तसेच अजित पवारांनी बँकेच्या संचालक मंडाळाची मतेही जाणून घेतली आहेत.

Ahmednagar District Central Cooperative Bank
Abdul Sattar News : पंचवीस वर्षापासून सत्तार साजरी करतात बंजारा समाजासोबत होळी..

आता बँकेच्या नवीन अध्यक्ष निवडीबाबत वरिष्ठांशी चर्चा करून उद्या सकाळी अध्यक्ष पदाचे नाव फायनल केले जाईल, असं अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे आता कुणाचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर होते? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Ahmednagar District Central Cooperative Bank
Vasant More News: वसंत मोरेंच्या मुलाला धमकीप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी...

या पार्श्वभूमीवरच बँकेच्या नवीन अध्यक्ष निवडीसाठी बुधवारी (दि.8 मार्च) संचालक मंडळाची विशेष सभा पार पडणार आहे. मात्र, त्या आधी पवारांनी संचालक मंडळाची बैठक घेतली. त्यामुळे आता अध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com