नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसाठी संघटनात्मक बदल करण्याऐवजी भाजपकडून (BJP) सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. विकेंद्रीकरण करताना निवडणुकीसाठी मध्यवर्ती कार्यालयात निर्णयाचे अधिकार न ठेवता विभागीय पातळीवर समिती नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीने भाजपने शिवसेनेच्या (Shivsena) पावलावर पाऊल ठेवले असून, शहराध्यक्ष गिरीश पालवे (Girish Palve) यांच्यासह प्रभारी आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पुढील वर्षाच्या प्रारंभी नाशिक महापालिकेच्या निवडणुका होत असून, या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षात सुरू झाली आहे. भाजपमध्ये सत्ता टिकविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विकासकामांच्या जोरावर मतदारांसमोर जाण्याची व्यूहरचना असली तरी संघटनात्मक पातळीवर भाजप मध्ये ‘हे राम’ म्हणण्याची वेळ आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत गटबाजी उफाळून त्याचा फटका बसू नये म्हणून निवडणुकीसंदर्भात निर्णय घेताना अधिकारांचे विक्रेंद्रीकरण करण्यात आले आहे.
अशा प्रकारचा निर्णय घेताना शहराध्यक्ष पालवे यांच्याबाबत असलेल्या नाराजीचे कारण मानले जात आहे. परंतु, निवडणुकीच्या तोंडावर बदल झाल्यास मतदारांमध्ये वेगळा संदेश जाण्याची भीती असल्याने अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरण करण्यात आल्याचे समजते. पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात शनिवारी बैठक झाली. प्रभारी आमदार जयकुमार रावल, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे, महापौर सतीश कुलकर्णी, विभागीय घटनामंत्री रवी अनासपुरे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, प्रदेश पॅनेलिस्ट लक्ष्मण सावजी, विजय साने, उप महापौर भिकूबाई बागूल, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनील केदार, जगन पाटील आदी उपस्थित होते.
विभागनिहाय समित्यांचे पदाधिकारी (सदस्य) असे, नाशिक रोड : दिनकर आढाव, संभाजी मोरुस्कर, संगीता गायकवाड, सतीश कुलकर्णी, प्रताप मेहरोलिया, मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड (समन्वयक), पंचवटी : बाळासाहेब सानप, गणेश गिते, उद्धव निमसे, अरुण पवार, रंजना भानसी, कमलेश बोडके, जगदीश पाटील. मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, चंद्रशेखर पंचाक्षरी (समन्वयक), सातपूर : महेश हिरे, दिनकर पाटील, शशिकांत जाधव, इंदूबाई नागरे. मंडल अध्यक्ष भगवान काकडे (समन्वयक), सिडको : महेश हिरे, गोविंद घुगे, मुकेश शहाणे, प्रतिभा पाटील. मंडल अध्यक्ष अविनाश पाटील शिवाजी बरके (समन्वयक), द्वारका : विजय साने, सतीश सोनवणे, चंद्रकांत थोरात, संध्या कुलकर्णी, अनिल ताजनपुरे. मंडल अध्यक्ष सुनील देसाई, भास्कर घोडेकर (समन्वयक), मध्य नाशिक : लक्ष्मण सावजी, भिकूबाई बागूल, शिवाजी गांगुर्डे, हिमगौरी आहेर-आडके, स्वाती भामरे. मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी (समन्वयक).
....
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.