Prafulla Patel News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेकडो महिला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राख्या बांधत आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना शंभर टक्के यशस्वी होईल, असा दावा या पक्षाने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते खासदार पटेल यांनी आज विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. आगामी निवडणुकीत जागा वाटपाबाबत कोणताही वाद होणार नाही, असा दावा त्यांनी केला. मात्र यावेळी उद्योगपती गौतम अदानी यांचा विषय निघताच ते गप्प झाले. या विषयावर बोलण्याचे टाळत जाऊ दे त्यावर काय बोलायचे असे विधान त्यांनी केले.
ते म्हणाले, आम्ही पक्ष म्हणून महिला शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नावर काम करीत आहोत. सरकार म्हणून देखील त्यावर अतिशय चांगले उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी अतिशय झपाट्याने कामाला लागले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महायुतीचे तिन्ही पक्ष विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढतील, हे निश्चित झाले आहे. स्वाभाविकपणे तीन पक्ष असल्याने जागा वाटपासाठी थोडासा वेळ लागणार आहे.
जागावाटपाच्या विषयावर लगेचच काही निर्णय होणार नाही. आम्ही महायुती म्हणून तिन्ही पक्षांच्या जागा वाटपाबाबत परस्पर सामंजस्याने त्यावर तोडगा निघेल. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांना आमच्यापेक्षा थोड्या जास्त जागा मिळतील. त्यावर कोणतेही भांडण होणार नाही. हे मात्र नक्की.
विरोधी पक्षाकडून लाडकी बहीण योजनेवर टीका होत आहे. त्याचा खासदार पटेल यांनी समाचार घेतला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे या योजनेवर का टीका करतात हे समजत नाही. ते सत्तेत असताना त्यांनी महिलांना काहीही दिलेले नाही.
लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक अस्वस्थ झाले असावेत. या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या आधी महिलांच्या खात्यात जमा होईल. महाराष्ट्रात सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा फायदा होईल.
यंदाच्या वर्षात एक जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोणतीही महिला त्यापासून वंचित राहणार नाह, याची दक्षता आम्ही घेत आहोत. या योजनेमुळे असंख्य महिला उपमुख्यमंत्री पवार यांना भाऊ म्हणून धन्यवाद देत आहेत. जिथे जनसमान यात्रा जाते तिथे त्यांना राख्या बांधल्या जातात.
राष्ट्रवादी काँग्रेसत्या जन सन्मान यात्रेला मिळणारा प्रतिसाद हे परिवर्तनाचे प्रतीक आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती शंभर टक्के पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.