Bachchu Kadu on Guwahati : बच्चू कडूंना अजूनही आठवतेय गुवाहाटी? म्हणाले, 'तिथं गेलेले सारे निवडून आले, मी एकटाच पडलो!'

Bachchu Kadu Slams BJP Mahayuti Government Anti-Farmer Policies in Newasa Ahilyanagar : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी भाजप महायुती सरकारच्या शेतीविरोधी धोरणांवर टीका केली आहे.
Bachchu Kadu on Guwahati
Bachchu Kadu on GuwahatiSarkarnama
Published on
Updated on

Prahar Janshakti Party Ahilyanagar : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांना अजूनही गुवाहाटी आठवते आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर सुरत व्हाया गुवाहाटी गाठले. तिथून महाराष्ट्रात येत, थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

लोकसभा आणि विधानसभा त्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. यात महायुती यश मिळालं. परंतु अमरावतीमधील प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडला, शिवसेनेला पाठिंबा देणारे, विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. याविषयी बच्चू कडू यांनी अहिल्यानगर नेवासा दौऱ्यावर खंत बोलून दाखवली.

मागील सरकारमध्ये तुम्ही राज्यमंत्री होता, त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंबरोबर गुवाहाटीला गेलात, सध्याचे सरकार आणण्यात तुमचा मोठा वाटा होता, तरी आज बच्चू कडू एकाकी पडल्यासारखे दिसताय, यावर काय सांगाल? बच्चू कडू म्हणाले,"तुम्ही हा प्रश्न अजितदादांना विचारत नाही, हा प्रश्न उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) विचारत नाही, आम्ही बरे गरीब सापडतो. आम्हालाच विचारता. तुम्ही सांगा गुवाहाटीला गेले ते सारे निवडून आले, मी एकटाच पडलो." बच्चू कडू यांनी असे म्हणताच, उपस्थितांमध्ये प्रचंड हशा झाला. परंतु दिव्यांग मंत्रालय स्थापन करू शकलो, हे काही कमी थोडे नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.

भाजप महायुती सरकारच्या शेतकरी (Farmer) विषयक धोरणांवर बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, "सरकार जागे होईल की, नाही माहित नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांना जागा करत आहोत. शेतकरी जागा झाला तर सरकारला गावात येऊन जागे व्हावे लागेल एवढी शेतकऱ्यांची ताकद आहे आणि माझा शेतकऱ्यांना विश्वास आहे."

Bachchu Kadu on Guwahati
Ahilyanagar school students mud protest : रस्ता कसला? सगळा चिखलच! शाळेतील मुलांनी महिला सरपंचांना घेरलं, मग काय? वाहनावर जोरदार चिखलफेक...

'मी शेतकरी, म्हणून त्याला उभं करायचा आहे, जेव्हा शेतकरी म्हणून आमचा शेतकरी उभा राहील, तेव्हा बच्चू कडूची गरज पडणार नाही. तेवढाच त्याच्या मागचा आमचा संदर्भ आहे, निवडणुकीचा नाही. आम्ही ज्या ज्या गावात जातोय तिथे लोकप्रचंड प्रतिसाद देत आहेत. जर आम्ही कष्ट केले, प्रामाणिकपणा दाखवला आणि इमानदारीने उभे राहिलो, तर आज कधी जमा न होणारा शेतकरी आज आमच्या बाजूने उभा राहील', असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

Bachchu Kadu on Guwahati
Aaditya Thackeray Worli : आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात CM फडणवीसांनी ठोकला 'परिवर्तना'चा शड्डू!

'शेतकरी जमा होण्यासाठी आमचे कष्ट आणि त्याग लागेल. समर्पित भावना ठेवून काम केल्यास त्यागाच्या भूमिकेतूनच हा शेतकरी उभा राहील. थोडा वेळ लागेल पण उभा राहील, तेव्हा इतका खंबीर राहील, तर त्याला बच्चू कडूची गरज पडणार नाही. आम्ही पोट न भरलेल्या लोकांसाठीच काम करतोय, पोट भरलेले लोक आमच्याकडे येणारच नाहीत. जे उपाशी आहेत ते आमच्या बाजूने येतील', असेही बच्चू कडू यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com