Nashik News: कांद्याचे थकीत पैसे मिळण्यासाठी `प्रहार`चे झोपडी आंदोलन!

बाजार समितीच्या लेखी आश्‍वासनानंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे
Onion producers agitaion
Onion producers agitaionSarkarnama
Published on
Updated on

देवळा : नोटबंदी (Demonetisation) काळातील कांदा उत्पादक (Onion producer) शेतकऱ्यांचे अडकलेले पैसे मिळावेत, या मागणीसाठी प्रहार (Prahar) शेतकरी संघटनेच्या वतीने येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर (Devla) सोमवारी राहुटी- झोपडी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे बाजार समिती (APMC) प्रशासनाने त्याची दखल घेत संबंधींताना सुचना केल्या. (Prahar Shetkari Sanghtana agitaion in Devla for sold Onion)

Onion producers agitaion
BJP News: काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणा!

प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय दहीवडकर, उपजिल्हाध्यक्ष कृष्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली राहुट्या टाकून अनोखे आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार विजय बनसोड यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत संबंधित व्यापाऱ्यांवर आरसीसीअंतर्गत केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. पुन्हा लिलावाची प्रक्रिया नियमानुसार राबविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितल्याने सायंकाळी उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले.

Onion producers agitaion
NCP News: बावनकुळे यांनी आधी आपली राजकीय उंची तपासावी!

तालुक्यातील स्व. निवृतीकाका देवरे कॄषी उत्पन्न बाजार समितीत नोटबंदी काळातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे व्यापाऱ्यांकडे अडकले आहेत. शेकडो शेतकऱ्यांनी २०१७- १८ या वर्षी उमराणा बाजार समितीत कांदा विक्री केला. नोटाबंदीचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी अनेकवेळा बाजार समिती प्रशासन, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक, पणन संचालक पुणे, सहकार मंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे तक्रारी दाखल केल्या. परंतु, अद्याप कोणतीही थेट कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांकडून पैसे मिळावेत, यासाठी देवळा तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने राहुटी- झोपडी आंदोलन करण्यात आले. प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष कृष्णा जाधव, कार्याध्यक्ष दशरथ पूरकर, उपतालुकाध्यक्ष हरीसिंग ठोके, शेतकरी चिंधा सोनवणे, दिलीप सोनवणे, कडू देवरे, जगन्नाथ सोनवणे, रामदास बागूल, श्रावण रामभाऊ, नवनाथ साळुंखे, जिभाऊ वाघ, बिबाबाई देवरे यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

देवळा बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक योगेश आहेर, कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने, राज्य संपर्कप्रमुख कुबेर जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ आदींनी या आंदोलनास भेट देत पाठिंबा दर्शवला. वाघ्या- मुरळी पथकाने उमराणा बाजार समिती प्रशासन व व्यापाऱ्यांची अब्रू वेशीवर टांगत गीते सादर केली.

देवळ्यांचे नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी भर पावसात आंदोलनस्थळी येत कसुरदार व्यापाऱ्यांवर आरआरसीअंतर्गत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.व्यापाऱ्यांच्या स्थावर मिळकतीचे जाहीर लिलाव राबविण्याबाबत कार्यवाही सुरू आहे, असे सांगितले. आजअखेर ७० टक्के रक्कम वसूल करुन थकीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली असल्याचे सांगितले.

जोपर्यंत व्यापाऱ्यांकडून थकवलेले पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. येत्या पंधरा दिवसांत जर शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही तर मंत्रालयासमोर आंदोलन करु.

- संजय दहीवडकर, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com