Prakash Ambedkar : भाजपचा खोटारडेपणा ओळखलेला बरा; प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी उठली, यात किती तथ्य? आंबेडकरांचा सवाल
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News :

कांदा निर्यातबंदी उठली की नाही, यावरून आता संभ्रम निर्माण झाला असून नेमके काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार निशाणा साधलाय.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, देवाने मला राम मंदिर बांधण्याचा आदेश दिला. हा माझ्या अर्थाने सगळ्यात मोठा प्रचार आहे, हे मी मानतो. उरलेला खोटारडेपणा आपण ओळखलेला बरा,' असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

Prakash Ambedkar News
Onion Export Ban: शेतकऱ्यांची चेष्टा करताय का? शेट्टी भडकले; 26 फेब्रुवारीला बाजार समित्या राहणार बंद

देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता कायम राहावी आणि भाव नियंत्रणात राहावेत, यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत लागू केलेली निर्यातबंदी (Onion Export Ban) कायम असेल, असे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी स्पष्ट केले आहे. परंतु भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी कांदा निर्यातीबद्दल सोशल मीडियावर (Social Media) चुकीची माहिती पसरवत आहेत. त्यातून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे.

आता शेजारील देशांमध्ये कांदा निर्यात करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. त्यानुसार केंद्र सरकार नाफेड आणि केंद्रीय महामंडळाच्या माध्यमातून कांदा खरेदी करून निर्यात करणार आहे, अशी माहिती दिली. यात कांद्याबाबत नेमकी काय परिस्थिती आहे, यावरून संभ्रमाचे वातावरण आहे. या सगळ्या गोंधळात प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या संभ्रमीत धोरणांवर जोरदार हल्ला चढवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अद्याप आघाडीमध्ये 'वंचित' नाही

महाविकास आघाडी 'इंडिया' नसून, ती महाराष्ट्रात 'महाविकास आघाडी' (MVA) आहे, असे सांगून महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला अद्यापही सहभागी करून घेण्यात आलेले नाही. आम्ही त्याची वाट पाहत आहोत, प्रकाश आंबेडकरांनी या वेळी स्पष्ट केले.

अगोदर महाविकास आघाडीत जागावाटप झाल्यानंतर आम्हाला हवे असलेल्या जागांसाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्याशी स्वतंत्र वाटाघाटी करू, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली.

नगर जिल्ह्यातील शिर्डीच्या जागेसाठी जिल्हा कार्यकारिणी आग्रही आहे. परंतु तेथून मी लढण्यास इच्छुक नाही. माझे सगळीकडे नाव आहे. शिर्डी मतदारसंघाची जागा ही शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. कार्यकारिणीने जोर लावल्यास ती जागा लढवण्यासाठी सक्षम उमेदवार देऊ शकतो, असेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दरम्यान, सोनई (ता. नेवासे) येथील धार्मिक स्थळी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना अटक केली आहे, परंतु या प्रकरणात जे दोषी असतील, त्यांच्यावरच कारवाई करा, ही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

(Edited by Avinash Chandane)

R

Prakash Ambedkar News
Nitesh Rane On Police : नीतेश राणेंच्या विरोधात 'पोलिस बॉईज' आक्रमक; 'त्या' विधानावर कारवाईची मागणी..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com