Prakash Ambedkar News: चर्चा फिस्कटल्यास, वंचितचा 'बी-प्लॅन' तयार

Vanchit Bahujan Alliance: महाविकास आघाडीत प्रवेश मिळाल्यास शिर्डीसह राज्यात २४ जागांवर दावा सांगणार असल्याची भूमिका वंचितने घेतली आहे.
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagar: महाविकास आघाडीबरोबर वंचित बहुजन आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुरू आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून स्पष्टता येत नसल्याने वंचितच्या नेत्यांचा आक्रमकपणा वाढला आहे. यामुळे वंचित दिवसेंदिवस महाविकास आघाडीविरोधात आक्रमक होत चालली आहे.

महाविकास आघाडीत प्रवेश मिळाल्यास २४ जागांवर दावा सांगणार असल्याची भूमिका वंचितने घेतली आहे. यात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा (Shirdi Lok Sabha constituency)देखील समावेश आहे. वंचितच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडीबरोबर जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यास वंचितचा 'बी-प्लॅन' तयार आहे, अशी माहिती वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण (Kisan Chavan) यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीबरोबर राज्यात वंचित इच्छुक असलेल्या जागांची चर्चा चालू आहे. ही चर्चा फिस्कटल्यास शिर्डीसह राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. लोकसभेला राज्यातील २४ जागांवर आम्ही चांगले आणि आक्रमक नेते देणार असल्याची माहिती वंचितचे प्रदेशा उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी श्रीरामपूरमध्ये दिली.

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी झालेल्या वाटाघाटीत वंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत. त्यावेळी वंचित स्वतंत्रपणे निवडणूक लढली. त्यावेळी शिर्डीच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला ७० हजारांवर मते मिळाली होती.

Prakash Ambedkar News
Sharad Pawar: शरद पवार अन् आमदार लंकेंचा एकमेकांना पुन्हा 'चकवा'

गेल्या पाच वर्षांपासून वंचितचे कार्यकर्ते राज्यभर राबत आहेत. गावापर्यंत पोहोचले आहे. जातीयवादी पक्षाविरोधात वंचितने सर्वात अगोदर लढा उभारला होता. सामाजिक सलोख्याची वंचितच्या कार्यकर्ते आणि नेत्यांवर गुन्हेदेखील दाखल झाले आहेत. त्यामुळे या लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत वंचितचा जो उमेदवार असेल, तो चांगल्या मतांनी बाजी मारेल, असा दावा प्रा. किसन चव्हाण यांनी केला.

महाविकास आघाडी बरोबर जागावाटपावर चर्चा चालू आहे. वंचितने राज्यात २४ जागा मागितल्या आहेत. तसा आग्रह आहे. यात शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जागेचादेखील समावेश आहे. राज्यात आम्हाला सन्मानजनक जागा मिळाव्यात, असा आमचा आग्रह आहे. महायुतीचा पराभवासाठी महाविकास आघाडीबरोबर युतीदेखील गरजेची आहे. वंचितला महाविकास आघाडीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास राज्यात स्वतंत्रपणे निवडणुकाला समोरे जाण्याची तयारी आहे, असेदेखील प्रा. किसन चव्हाण यांनी म्हटले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com