Pratap Dhakne : पाथर्डी तालुक्यात रस्त्यावरून राजकारण पेटले!

Monica Rajale : प्रताप ढाकणेंचा आमदार राजळेंवर निशाणा
Monica Rajale, Pratap Dhakne
Monica Rajale, Pratap Dhaknesarkarnama
Published on
Updated on

Nagar : पाथर्डी तालुक्यातील करोडी ते टाकळीमानुर रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे यांनी भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्यावर निशाणा साधला आहे. मर्जीतील लोकांना काम मिळवून देण्यासाठी हजारो लोकांना गेल्या काही महिन्यांपासून वेठीस धरले जात आहे.हजारो कोटींची कामे केल्याची सांगता मग या रस्त्याबाबत आपली भूमिका अशी का, हे जनतेला सांगावे, असे खुले आव्हान प्रताप ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांना दिले.

Monica Rajale, Pratap Dhakne
Manoj Jarange Patil News : तीच चर्चा, भाषा अन् आश्वासने ; जरांगे पाटील सरकारला मुदतवाढ देणार का... ?

करोडी ते टाकळीमानूर हा रखडलेला रस्त्याचे काम आठवड्यात पूर्ण न झाल्यास मागे झाले त्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. या आंदोलनाची जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशारा दिला प्रताप ढाकणे यांनी दिला. टाकळीमानुर पाथर्डी तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. जवळपास २५ गावे व वाडी वस्त्यांचा या बाजारपेठेशी थेट संबंध येतो.

मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे. या रस्त्यासाठी करोडी येथे पाथर्डी-बीड या राज्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. आता हा विषय राजकीयदृष्ट्या कळीचा मुद्दा ठरला असून विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात जनतेचाही रोष वाढला आहे.प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान तालुका प्रशासनाला पंधरा दिवसांच्या अवधीत काम सुरू करणार असे सांगितले होते.

ढाकणे यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या विषयाचा पाठपुरावा केला. मात्र अजूनही रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश जारी झाला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी ढाकणे यांना दिली. सोमवारपासून पुढील आठवड्यात कार्यारंभ आदेश पारित करून प्रत्यक्षात काम सुरू झाला नाही, तर मी स्वतः काम सुरू करण्यासाठी कोणत्या स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा ढाकणे यांनी प्रशासनाला दिला.

Monica Rajale, Pratap Dhakne
Madhya Pradesh : पराभव काँग्रेसच्या जिव्हारी, कमलनाथ यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com