Ahmednagar News : अभिमानास्पद! अमेरिकेतील 'ELLKAY' कंपनीच्या अध्यक्षपदावर मराठमोळा चेहरा

Ajay Kapare : अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणाने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीनं देशाची मान जागतिक पातळीवर अभिमानानं उंचावली आहे.
Ajay Kapare
Ajay KapareSarkarnama

Ahmednagar : शिक्षण, अफाट मेहनत, प्रबळ इच्छाशक्ती, चिकाटी यांच्या जोरावर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा देश - विदेशात उमटविलेली अनेक उदाहरणं अवतीभवती पाहायला मिळतात. आता अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणाने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीनं देशाची मान जागतिक पातळीवर अभिमानानं उंचावली आहे.

अहमदनगरमधील शेवगाव(Shevgaon) तालुक्यातल्या सामनगाव येथील अजय कापरे या तरुणानं अमेरिकेतील 'ELLKAY' कंपनीचा अध्यक्ष होण्याचा मान मिळवला आहे. या कंपनीचं आरोग्य, देखभाल, तंत्रज्ञान व उपाययोजना या क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल असून मोठा नावलौकिक मिळवला आहे.

Ajay Kapare
NCP Vs Congress : '' आघाडीत राष्ट्रवादीच मोठा पक्ष...''; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याची अजितदादांच्या विधानाला सहमती

अमेरिके(America)तील 'ELLKAY' कंपनीचं न्यू जर्सी येथे मुख्यालय आहे. तसेच या कंपनीत ७५० हून अधिक कर्मचारी आहे. रुग्णालय, आरोग्य प्रणाली, निदान प्रयोगशाळा, आरोग्यसेवा यामध्ये या कंपनीचं उल्लेखनीय काम आहे. कापरे हे २००२ पासून एँलिके या कंपनीत काम करत आहेत. त्यात मागील सहा वर्षांपासून धोरण व विपणन अधिकारी म्हणून या कंपनीत जबाबदारी पार पाडत आहे.

अजय कापरे हे मुळचे सामनगाव (ता. शेवगाव) येथील रहिवाशी व अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त असलेल्या ॲड. वसंतराव शाहुराव कापरे यांचे धाकटे चिरंजीव आहेत. तर युवा सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक विजय कापरे यांचे ते बंधू आहेत. संगणक अभियांत्रिकीत पदवीधर असलेल्या कापरे यांनी टेक्सास टेक विद्यापीठातून एम. बी. ए. मार्केटिंगची पदवी घेतली.(Latest Marathi News)

Ajay Kapare
Pimpri-Chinchwad: भाजप वॉशिंग मशीन, तर ईडी वॉशिंग पावडर; जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल

कापरे यानं आपल्या प्रचंड मेहनत, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणाने अल्पावधीत थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपनीच्या व्यवस्थापनाचे प्रमुखपद मिळवल्याने गावाची, तालुक्याची व जिल्ह्याची मान देखील अभिमानाने उंचावली आहे.

संस्थेच्या कामकाजाची प्रक्रिया व प्रणाली सुधारण्यासाठी तसेच हेल्थ केअर टेक्नालॉजी सोलुशन विकसीत करण्यासाठी वितरण संस्थांना समर्थन देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्या दृष्टीने संस्थेच्या कार्यकारी मंडळाने त्यांच्यावर अधिक जबाबदारीचा भार म्हणून थेट 'ELLKAY' या कंपनीचे अध्यक्ष व मुख्य धोरण अधिकारी म्हणून नियुक्ती देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com