Nilesh Ghaiwal passport : निलेश घायावळचं पासपोर्ट व्हेरिफेक्शन, धक्कादायक माहिती उघड; पोलिसांचा रिमार्क "Not Available", तरी कन्फर्मेशन झालं कसं?

Pune Gangster Nilesh Ghaiwal Passport Verification – Ahilyanagar SP Somnath Gharge : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायावळ याच्या पासपोर्ट व्हेरिफेक्शनवर अहिल्यानगर पोलिस दलानं मोठा खुलासा केला आहे.
Nilesh Ghaiwal passport
Nilesh Ghaiwal passportSarkarnama
Published on
Updated on

Pune gangster Nilesh Ghaiwal : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पसार झाला आहे. लंडन गेल्याची माहिती समोर येत आहेत. त्याला यासाठी पासपोर्ट कसा मिळाला? राजकीय वरदहस्त मिळाला का? की पोलिस दलांतूनच मदत झाली? यावर काथ्याकूट सुरू आहे.

यातच त्याच्या पासपोर्ट व्हेरिफेक्शन संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर पोलिस दलाचे अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत 'सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला आहे.

पुण्याचा गुंड निलेश घायवळ याचे मुलं लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. तशी पुणे पोलिस (Pune Police) दलाचे उपायुक्त संभाजी कदम यांनी या माहिती दुजोरा दिला. त्यामुळे निलेश घायवळ हा लंडनलाच गेल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातील त्याच्या घरावर छापा घालून तिथून दोन अलिशान वाहनं जप्त केली आहेत. तरी प्रश्न येतो, परदेशात जाण्यासाठी निलेश घायवळ याचे पासपोर्ट व्हेरिफेक्शन झाले कसे? पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी त्याचा शोध सुरू आहे, असेही स्पष्ट केले आहे.

दरम्यान, निलेश घायवळ याने पासपोर्ट व्हेरिफेक्शनसाठी अहिल्यानगर शहरातील माळीवाड्यातील त्याचा जुना पत्ता दिला होता. पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज सादर करताना, त्याने अहिल्यानगर शहरातील गौरी घुमट, आनंदी बाजार, माळीवाडा रोड असा पत्ता दिला होता. यानंतर अर्ज पडताळणीसाठी हे प्रकरण अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिस (Police) ठाण्याकडे आले.

Nilesh Ghaiwal passport
Nilesh Ghaiwal Pune : डझनाने गुन्हे, तरी गुंड निलेश घायवळ इंग्लंडला पळाला; पासपोर्टसाठी कोणाचा वरदहस्त?

कोतवाली पोलिस ठाण्याकडे त्याच्या पासपोर्ट व्हेरिफेक्शनसाठी 23 डिसेंबर 2019 रोजी ऑनलाईनपद्धतीने अर्ज आला. कोतवाली पोलिसांनी या अर्जावर पडताळणी केली. तसेच अर्जदाराशी संपर्क देखील केला. पत्त्यावर चौकशी केली, तर तिथं देखील कोणी आढळून आलं नाही. यामुळे कोतवाली पोलिसांनी अहिल्यानगर पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत सदरचे पासपोर्ट प्रकरण 16 जानेवारी 2020 रोजी प्रतिकूल म्हणजेच "Not Available" रिमार्क करून पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयास पाठवले. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी संपर्क साधला असताना, त्यांनी या माहितीला दुजोरा दिला.

Nilesh Ghaiwal passport
Top 10 News : राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू! भाजप प्रवक्त्याची धमकी; जळगावात शिवसेनेचा नेता गोत्यात, फार्म हाऊसवर सुरु होतं धक्कादायक कृत्य - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

राजकीय कनेक्शनच्या चर्चांना बळ

अहिल्यानगर पोलिसांचा "Not Available" रिमार्क असून देखील निलेश घायवळ याला पासपोर्ट मंजूर झाल्याचे यामुळे समोर येत आहे. त्यामुळे कोणीतरी राजकीय शक्ती त्यासाठी काम करते आहे का? अशा चर्चांना आता बळ येऊ लागले आहे. अहिल्यानगर तसेच मराठवाड्यातील निलेश घायवळ याचे राजकीय कनेक्शन आहेत. मध्यंतरी अहिल्यानगरमधील एका मोठ्या यात्रेत राज्यातील मोठ्या राजकीय व्यक्तीबरोबर निलेश घायवळ सहभागी झाला होता. त्यामुळे ही यात्रा, त्याचे राजकीय कनेक्शन चर्चेत आले होते.

पासपोर्ट जमा करण्याचा आदेश, तरी...

दरम्यान, पुण्यातील एका प्रकरणात उच्च न्यायालयाने त्याचा पासपोर्ट जमा करण्याचा आदेश दिला होता. तरी देखी त्याने तो जमा केलेला नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात उच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून पुणे पोलिसांकडून कारवाईची तयारी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. निलेश घायवळ याने पासपोर्ट कसा मिळवला, हा पोलिसांच्या तपासाचा अन् संशोधनाचा विषय बनला आहे. पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात कुठेतरी पाणी मुरले असल्याची शंका पोलिस व्यक्त करू लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com