Radhakrishna Vikhe Latest News : पिसाळलेलं कुत्रं अन् काय-काय...; विखे पाटील संजय राऊतांवर भडकले, कारण काय ?

Sanjay Raut : 'महानंद'ची गोरेगाव येथील जमीन अदानीला विकण्याचा डाव; राऊतांचा आरोप
Radhakrishna Vikhe, Sanjay Raut
Radhakrishna Vikhe, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी "महानंद"च्या जमिनीबाबत केलेल्या आरोपांवरून महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे हे चांगलेच संतापले आहेत. "खासदार संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांच्याविरुद्ध आता अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. त्यांनी आरोप सिद्ध केल्यास राजकारणातून संन्यास घेईल", असेही मंत्री विखे यांनी म्हटले आहे. (Radhakrishna Vikhe Latest News)

मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी नगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील टंचाई आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांना 'महानंद'ची गोरेगाव येथील 50 एकरची प्राइम लोकेशनची जमीन अदानीला विकण्याचा डाव असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. खासदार राऊत यांच्या या आरोपावर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी समाचार घेतला. मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, "मी वारंवार सांगत आलेलो आहे खासदार राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ती जी मुक्ताफळे उधळत आहेत, खरंतर त्यांना मानसोपचाराची गरज आहे. ती कोणत्या 50 एकर जमिनीचे आरोप करताहेत हे त्यांनाच माहिती आहे." (Mahanand)

Radhakrishna Vikhe, Sanjay Raut
Latest News on Latur Congress : विलासरावांनी करून दाखवले; चिरंजीवांना जमणार का?

मी आत्तापर्यंत पुष्कळ सहन केले. तसेच काही पथ्यंदेखील पाळतोय. परंतु त्यांनी 'महानंद'बाबत बेताल वक्तव्य करत असतील तर त्यांनी त्याचे परिणाम भोगायला तयार राहावे. मी आता त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. तुम्ही ५० एकरचा दावा करत आहे, तो सिद्ध करावा सिद्ध न केल्यास त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईल, असा इशाराही विखे यांनी दिला आहे.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या सत्ताधारी पक्षावर मुंबई विकण्याचा डाव आहे असेदेखील आरोप केले आहेत. यावर मंत्री विखे म्हणाले, खासदार राऊत यांना लोकांनी गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी व्यक्तिगत जीवनात काय केले, कोणाचे घर फोडले, हे मलाही सांगावे लागेल. ते पिसाळलेल्या कुत्र्यासारखे बोलतात अशी उपमा वापरल्यास हे सर्वात जास्त वाईट होईल. त्यामुळे ही म्हणण्याची विरोधकांनी आमच्यावर वेळ आणू नये, असा संताप मंत्री विखे यांनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

R

Radhakrishna Vikhe, Sanjay Raut
Lok Sabha Election 2024 : मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात; २७ फेब्रुवारीच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com