Ahmednagar Politics : संघर्ष जुनाच... पण, 'अर्थ अन् महसूल'मधून विखे-पवारांचं 'मेतकूट' जमलं ?

Ajit Pawar And Radhakrishna Vikhe Patil : महसूल सप्ताहाच्या कार्यक्रमात एकमेकांवर कौतुकांचा वर्षाव
Radhakrishna Vikhe Patil, Ajit Pawar
Radhakrishna Vikhe Patil, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि विखे परिवार यांचे राजकीय वैर सर्वश्रृत आहे. त्यांच्यातील अटीतटीचे राजकारण राज्यात नेहमीच चर्चेत राहिले आहे. राजकारण राज्याचे असो वा नगर जिल्ह्याचे, पवारांनी विखेंना तर विखेंनी पवारांना मात देण्याचा वेळोवेळी कसोशीने प्रयत्न केला आहे. एकीकडे काँग्रेस अथवा काँग्रेस-राष्ट्रवादी असे सत्तेत अनेकवर्षं एकत्र असले तरी पवार-विखे राजकीय संघर्ष टोकाचाच दिसून आला. आता बदलत्या राजकीय परिस्थितीत मात्र अजित पवारांनी घेतलेल्या स्वतंत्र भूमिकेने कुठेतरी विखे-पवार यांच्यातील मेतकूट जमून येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. (Latest Political News)

Radhakrishna Vikhe Patil, Ajit Pawar
Kolhapur Gokul Dudh Sangh: ठेक्यावरून 'गोकुळ'चे राजकारण पेटले; शौमिका महाडिक अन् सत्ताधारी एकमेकांसमोर ठाकले

राज्याच्या सध्याच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री आहेत तर अजित पवार अर्थमंत्री आहेत. महसूल आणि अर्थ ही खाती राज्याचा कणा मानली जातात. राज्याचा विकासात्मक अर्थगाडा या दोन्ही खात्याच्या कामगिरीवर अवलंबून असतो. त्याच अनुषंगाने १ ऑगस्ट रोजी साजरा होणारा महसूल दिन यंदा प्रथमच साप्ताहिक स्वरूपात साजरा होत आहे. या सप्ताहाचा शुभारंभ अजित पवार आणि राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी दोघांनीही एकमेकांचे कामाचे कौतुक करतानाच राज्याच्या विकासाचा झेंडा दोघांनी हातात घेतल्याचे दाखवले.

Radhakrishna Vikhe Patil, Ajit Pawar
Delhi Service Bill : अमित शाह की अरविंद केजरीवाल! दिल्ली प्रशासनावर हुकूमत कुणाची ? आज होणार स्पष्ट

पवार परिवाराचा नगर जिल्ह्याशी जुना संबंध आहे. शरद पवारांचे सामाजिक आंदोलनातून पुढे आलेल्या नेतृत्वाचा शुभारंभ विखेंच्या प्रवरानगर परिसरातूनच झाला. अजित पवारांचे आजोळ लोणीजवळच देवळाली प्रवरा आहे. तर आमदार रोहित पवारांचे आजोबा आणि शरद पवारांचे बंधू दिवंगत आप्पासाहेब पवार हे प्रवरा साखर कारखान्यात शेती अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राहिले आहेत. पवार कुटुंबाचा नगर आणि विखे परिवाराशी जुना ऋणानुबंध असला तरी राजकीय वळणावर शरद पवार आणि बाळासाहेब विखे यांच्यात राजकीय संघर्ष झाला आणि तो कोर्टापर्यंत गेला.

Radhakrishna Vikhe Patil, Ajit Pawar
Dada Bhuse on Traffic : आठ दिवसांत वाहतूक कोंडी दूर होईल!

दरम्यान, रोहित पवार-सुजय विखे यांच्यातील स्नेहपूर्व संबंधही कार्यक्रम आणि गाठीभेटी निमित्ताने दिसून आले. आता अजित पवार आणि राधाकृष्ण विखे महायुती सरकारमध्ये अगदी महत्वाच्या आणि सांगड असलेल्या महसूल आणि अर्थ विभागानिमित्त जवळ येताना दिसत आहेत. येणाऱ्या काळात याच सुधारताना दिसत असलेल्या संबंधावर शरद पवार आणि राधाकृष्ण विखे कशा पद्धतीने 'रि-अॅक्ट' करतात यावरच वर्षानुवर्षांचा राजकीय संघर्ष खरेच संपणार का, हे पहावे लागेल.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com