Radhakrishna Vikhe Patil : 'महसूल'मधील रखडलेली लोकांची कामे वेळेतच पूर्ण करण्याचा इरादा; विखे पाटलांनी घेतला 'हा' निर्णय

Maharashtra Revenue Department : विद्यार्थी, सौनिकांच्या रखडलेली कामे लागणार मार्गी
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News: राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्यानंतर राज्यात 'ट्रिपल इंजिन' सरकार आले असून रखडलेल्या कामांचा निपटरा तात्काळ करत असल्याचा गवगवा महायुतीतील पक्षांच्या वतीने करण्यात येत आहे. यातच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील महसूल सप्ताहानिमित्त 'अॅक्शन मोड'वर आल्याचे दिसून येत आहे. राज्यातील महसूलसंबंधित लोकांची रखडलेली कामे, अर्ज आदी कामे वेळेतच पूर्ण करण्याचा इरादा विखे पाटलांनी करून तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. सप्ताहात वरिष्ठ आधिकाऱ्यांनी एकदिवस दुर्गम भागात मुक्काम करून तेथील समस्या जाणून घेण्याचे आवाहनही विखे पाटलांनी केले आहे. (Latest Political News)

Radhakrishna Vikhe Patil
Mahesh Landge News : महेश लांडगेंचा हट्ट पंतप्रधान मोदी 'असा'च पूर्ण करणार!

राज्यात शासन आपल्या दारी या उपक्रमाचा धडाका सुरू असल्याचे दिसून येत आहे. यातच महसूल विभागाशी संबंधित लोकांच्या तक्रारी तसेच अर्जावर कालमर्यादेत निपटारा होऊन दर्जेदार सेवा देण्यासाठी १ ऑगस्टपासून महसूल दिनानिमित्त राज्यात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रामसाठी मंत्री विखे पाटलांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त, सर्व प्रांताधिकारी यांची बैठक घेवून सप्ताहाच्या नियोजनाचा आढावा घेतला. या उपक्रमाचे स्वरुप केवळ शासकीय न करता विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा लोकांशी संवाद कसा होईल, असा प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Madha Loksabha : भाजप खासदाराच्या विजयाची जबाबदारी घेतली राष्ट्रवादीच्या बबनदादांनी; दोन लाख मताधिक्क्याची ग्वाही

"लोकाभिमुख कामांचा करुनी निपटारा; चला करुया महसूल सप्ताह साजरा" या ब्रीद वाक्याने या महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महसूल विभागासंबंधित लोकांच्या तक्रारी तसेच अर्जांवर कालमर्यादेत निपटारा होऊन जनतेला अधिक चांगली दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न सात दिवसात केला जाईल. याबरोबरच विभागाच्या वेगवेगळ्या निर्णयातून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचेही विखेंनी स्पष्ट केले आहे.

Radhakrishna Vikhe Patil in Meeting
Radhakrishna Vikhe Patil in MeetingSarkarnama

या सप्ताहाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यात युवा संवादाच्या माध्यमातून महसूल विभाग महाविद्यालयांमध्ये जावून विद्यार्थ्यांच्या समस्या २ ऑगस्ट रोजी जाणून घेवून मार्गदर्शन करण्यात येईल. ३ ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा या उपक्रमातून गावपातळीवरील लोकांचे महसूल विभागाच्या संबधात काही प्रश्न जाणून घेवून सोडविण्यात येतील.

Radhakrishna Vikhe Patil
Sambhaji Bhide Controversy : भिडेंच्या वादग्रस्त विधानानंतर मनसेच्या पोस्टची चर्चा; 'गांधीजींसारखा दुसरा होणे नाही..'

माजी सैनिकांचे तसेच त्यांच्या कुटुबियांचे प्रश्न सोडविण्यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. यासह कार्यालय आणि परीसर स्वच्छता मोहीम, राईट टू सर्व्हीस कायद्याची अंमलबजावणी, सिक्स बंडल रेकॉर्ड उपक्रम, कार्यालयातील सेवेची कार्यप्रणाली या सप्ताहानिमित्त तयार करावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकदिवस दुर्गम भागात मुक्काम करून गावाचे प्रश्न जाणून घेण्याचे आवाहनही मंत्री विखे पाटील यांनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com