Mahesh Landge News : महेश लांडगेंचा हट्ट पंतप्रधान मोदी 'असा'च पूर्ण करणार!

Narendra Modi News : आमदार लांडगे यांच्याच मतदारसंघात सुरवातीपासून शहराचा हा एकमेव कचरा डेपो आहे.
Mahesh Landge, Narendra Modi News
Mahesh Landge, Narendra Modi NewsSarkarnama

Pimpri-Chinchwad news : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पीपीपी (public private partnership) तत्वावरील डीबीओटी मॉडेलअंतर्गत शहराच्या मोशी कचरा डेपोतील कचऱ्यापासून वीज निर्माण करणाऱ्या (waste to energy) प्रकल्पाचे उद्घाटन येत्या मंगळवारी (१ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पुण्यातून ऑनलाईन करणार आहेत. त्यातून भोसरीचे सलग दुसऱ्यांदा २०१९ ला आमदार झालेले महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी त्यांच्या २०१४ च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत दिलेले 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाचे आश्वासन नऊ वर्षानंतर पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनाला नरेंद्र मोदी यावेत असा हट्ट लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीतील नेत्यांकडे धरला होता तो आता पूर्ण होणार आहे.

आमदार लांडगे यांच्याच मतदारसंघात सुरवातीपासून शहराचा हा एकमेव कचरा डेपो आहे. सध्या शहरात दररोज साडेअकराशे टन कचरा निर्माण होत आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करून तो टाकला जात असल्याने मोशी कचरा डेपोत त्याचे डोंगर तयार झाले आहेत. हिवाळ्यात त्याच्या दुर्गंधीचा त्रास मोशीच नाही, तर भोसरीच्या इंद्रायणीनगरसारख्या भागापर्यंत जाणवतो.

Mahesh Landge, Narendra Modi News
Narendra Modi News : पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याला विरोध; बाबा आढावांच्या नेतृत्वात २६ पक्ष, संघटना ऐकवटल्या

एवढेच नाही, तर पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांतील प्रवाशांनाही मोशीत नाक मुठीत धरावे लागते. १९९१ पासून हा त्रास मोशीकर सहन करीत होते व आहेत. त्यामुळे ते त्रस्त असल्याने २०१४ च्या आमदारकीच्या पहिल्या निवडणुकीत लांडगेंनी कचऱ्यापासून वीज तयार करून हा त्रास थांबविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महापालिकेत त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसची (NCP) सत्ता होती. त्यामुळे त्यांचे हे आश्वासन ते आमदार झाले, तरी लगेच पूर्ण होऊ शकले नव्हते.

मात्र, २०१७ ला पिंपरी पालिकेत प्रथमच भाजपची (BJP) सत्ता आली. त्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली. स्थायी समिती आणि नंतर पालिका सभेने या कामाला २०१८ ला मंजूरी दिली. त्यानंतर त्याचे टेंडर निघाले. त्याचवर्षी कामाचा आदेशही झाला. दरम्यान, कोरोना आला त्याने या कामात अडथळा आणला. अखेरीस अडीच वर्षानंतर तीनशे कोटी रुपये खर्चून ते आता पूर्ण झाले. प्रायोगिक तत्वावर कचऱ्यापासून वीज निर्माण केली गेली. त्यानंतरच त्याचे औपचारिक उद्घाटन आता येत्या मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे.

Mahesh Landge, Narendra Modi News
Manipur News : विरोधी पक्षांच्या खासदारांचा मणिपूर दौरा केवळ दिखावा; केंद्रीय मंत्री ठाकूरांचा हल्लाबोल

दरम्यान, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामुळे मोशीकरांची ३३ वर्षाच्या दुर्गंधीच्या वनवासातून आता मुक्तता होणार आहे. तसेच दीड वर्षातच कचरा डेपोतील कचऱ्याचे डोंगरची सपाट होणार असल्याने त्याची त्यातही हिवाळ्यात अधिक करून परिसरात पसरणारी दुर्गंधी आता थांबणार आहे. 'भोसरी व्हीजन- २०२०' मधील या प्रकल्पाची आणि २०१४ च्या निवडणुकीतील आश्वासनाचीही पूर्तता होत असल्याने लांडगे यांनी समाधान व्यक्त केले. आता मोशीकरांना मोठा दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com