Radhakrishna Vikhe : 'जे हिंदूंचे ते हिंदूंचेच राहिले पाहिजे, अतिक्रमणे झाली असतील तर...' ; विखे-पाटलांचं वक्तव्य!

Asaduddin Owaisi On Babri mosque : खासदार ओवैसींच्या म्हणण्याला फारसं महत्त्व देऊ नये, असंही म्हणाले आहेत.
Radhakrishna Vikhe vs Asaduddin Owaisi
Radhakrishna Vikhe vs Asaduddin OwaisiSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : 'देशात कुठेही मशिदींवर अतिक्रमणाच्या तक्रारी नाहीत. तसे कुठेही वातावरण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येतील मशिदीच्या प्रमुखांनीच स्वागत केले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे,' असे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

'एमआयएम'चे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी नुकतंच अयोध्येतील बाबरी मशिदीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं असून, त्यांनी मुस्लिम तरुणांना उद्देशून प्रक्षोभक विधान केल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe vs Asaduddin Owaisi
Maratha Reservation Issue : ‘जरांगेंनी समजून घ्यावे’; विखे पाटलांनी सरकारची बाजू मांडली

ओवैसींनी नेमकं काय म्हटलं?

यामध्ये ओवैसींनी म्हटले आहे की, तरुणांनो आपण आपली मशीद गमावली आहे. तिथे काय केले जात आहे, ते आपण बघत आहोत. तुम्हाला याचा त्रास होत नाही का? जिथे आपण 500 वर्षे बसून कुराण-ए-करीमचे पठण केले, आज ती जागा आमच्या हातामध्ये नाही.

तसेच, तरुणांनो, आणखी 3 ते 4 मशिदींबाबत षड्यंत्र सुरू आहे. ज्यामध्ये दिल्लीतल्या मशिदीचाही समावेश आहे. या शक्ती तुमच्या मनातून ऐक्य काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी परिस्थिती तुम्हाला पाहिजे आहे का? या गोष्टीकडे आपण गांभीर्याने बघितले पाहिजे, असंही ओवैसींनी म्हटलेलं आहे.

यासंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी ओवैसी यांच्या म्हणण्याला फारसे महत्त्व देऊ नये, असे सांगितले. ते म्हणाले, देशात कुठेही असे प्रकार सुरू नाहीत. देशातील सामाजिक वातावरण अतिशय चांगले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत गेले तेव्हा मशिद समितीच्या प्रमुखांनी स्वतः त्यांचे स्वागत केले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

आपल्याकडे गावोगावी नागपंथी, तसेच अन्य समाजाच्या समाधी होत्या. गावोगावी जत्रा व्हायच्या सर्वधर्मीय नागरिक त्यात सहभागी व्हायचे. मात्र वक्फ बोर्डाच्या काही निर्णयामुळे अडचण झाली. वक्फ बोर्डाने काही जमिनी ताब्यात घेतल्या, त्यातून ही समस्या निर्माण झाली. सर्वोच्च न्यायालयानेदेखील वक्फ बोर्डाच्या निर्णयांचा फेरआढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Radhakrishna Vikhe vs Asaduddin Owaisi
Eknath Shinde News : परभणीत बॅकफूटवर असलेल्या शिवसैनिकांना मुख्यमंत्री बळ देणार...

त्यामुळे याबाबत उगीचच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत असतील, तर त्याकडे फारसे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. जे हिंदूंचे ते हिंदूंचेच राहिले पाहिजे, अतिक्रमणे झाली असतील तर ती काढलीच पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com