Rahul Dhikale Won: राहुल ढिकले यांनी घडवला इतिहास, ११ जणांची अनामत केली जप्त!

Rahul Dhikale; BJP's MLA Rahul Dhikale Won with large lead of votes, Defeat NCP's Ganesh Gite-भाजपचे आमदार राहुल ढिकले यांनr राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गणेश गीते यांना विक्रमी मताधिक्य घेत केले पराभूत.
Ganesh Gite & MLA Rahul Dhikle
Ganesh Gite & MLA Rahul DhikleSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs NCP Sharad Pawar: नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे आमदार राहुल ढिकले यांनी विक्रम केला आहे. त्यांनी गत निवडणुकीत मिळालेल्या मतांएव्हढे मताधिक्य घेत अकरा उमेदवारांची अनामत जप्त केली.

आज झालेल्या मतमोजणीत अंतीम फेरीखेरीस भाजपचे आमदार ढिकले यांना एक लाख पंचवीस हजार ८८५ मते मिळाली. त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गणेश गिते यांना ब्यान्नव हजार ८८५ मते मिळाली. आमदार ढिकले हे त्र्याऐंशी हजार ९४४ मताधिक्यांनी विजयी झाले. त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला.

Ganesh Gite & MLA Rahul Dhikle
Dilip Borse Won Baglan : भाजपच्या आमदार दिलीप बोरसे १.२९ लाख मतांनी विजयी, दीपिका चव्हाण यांचा धुव्वा!

नाशिक पूर्व मतदार संघात विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना भाजपने पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर केली. विरोधकांचा उमेदवार कोण याबाबत मात्र बऱ्याच दिवस खल सुरू होता. अखेर भाजपतून आयात केलेले महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली.

Ganesh Gite & MLA Rahul Dhikle
Saroj Ahire Won: सरोज अहिरे ४० हजारांच्या मताधिक्याने विजयी, शिवसेनेचे योगेश घोलप तिसऱ्या स्थानी!

नाशिक पूर्व मतदार संघात विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना भाजपने पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर केली. विरोधकांचा उमेदवार कोण याबाबत मात्र बऱ्याच दिवस खल सुरू होता. अखेर भाजपतून आयात केलेले महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली.

नाशिक पूर्व मतदार संघ हा प्रामुख्याने पंचवटी आणि नाशिक रोड अशा दोन भागात विभागलेला आहे. याशिवाय आडगाव आणि मखमलाबाद ही दोन प्रमुख गावे त्यात आहेत. या भागाचे सामाजिक दृष्ट्या संमिश्र प्रश्न आहेत. निवडणुकीत मात्र आमदार ढिकले यांनी आपला पारंपारिक जनसंपर्क आणि विकास कामे यावर भर दिला होता. गणेश गीते यांनी या मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन मांडले.

आमदार ढिकले यांच्यासाठी पंतप्रधान मोदी आणि मंत्री गिरीश महाजन यांचा भाजपच्या विविध नेत्यांनी सहभाग घेतल्या. गणेश गीते यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे आणि आणि त्यांच्या सभा झाल्या.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक पूर्व मतदार संघातून महायुतीला दहा हजार चारशे मतांची आघाडी होती. त्यामुळे भाजपला ही आघाडी कायम ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र संबंध मतदारसंघ पिंजून काढला. नाशिक रोड भागातील काही भाजपचे नेते गीते यांच्या पाठीशी उभे असल्याची चर्चा होती. पंचवटी परिसरातही गीते यांना भाजपचे छुपी रसद मिळाल्याचे बोलले जाते. मात्र महायुतीच्या बाजूने वारे असल्याने ढिकले यांनी विजयश्री खेचून आणली.

या मतदारसंघात प्रचारात प्रचंड चुरस होती. गीते यांच्या वाहनांवर तीन वेळा हल्ले करण्यात आले. या संदर्भात पोलिसांतही गुन्हे दाखल झाले. त्यामुळे वादविवाद आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांवर शाब्दिक तसेच शारीरिक खाल्ले झाल्याने ही निवडणूक दोन्ही उमेदवारांनी प्रतिष्ठेची केली होती.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com