Rahul Gandhi Politics: काँग्रेस आक्रमक, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या न्यायालयीन चौकशीची मागणी!

Rahul Gandhi; Congress aggressive regarding assembly election process, Congress march in Amalner-अमळनेर (जळगाव) येथे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांचा निवडणूक आयोगाविरोधात मशाल मोर्चा
Congress delegation at Amalner
Congress delegation at AmalnerSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Congress News: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावरून झालेला वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. जळगाव मध्ये काँग्रेस या प्रश्नावर आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी सायंकाळी मशाल मोर्चा काढत निवडणूक आयोगाविरोधात गंभीर आरोप केले.

काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी अंमळनेर येथे मशाल मोर्चा काढला. या मशाल मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी देखील सहभागी झाले. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबाबत सामान्य जनतेमध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सविस्तर आक्षेप नोंदविले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. संसदेत या प्रश्नावर आवाज उठविण्यात आला. त्याला उत्तरे देण्याऐवजी निवडणूक आयोग सर्व सारव करीत आहे. आता तर मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याची तयारी सुरू आहे.

Congress delegation at Amalner
Dhule Politics : धुळ्यात भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडीची व्यूहरचना ठरली, थेट वरिष्ठ पातळीवरून आले आदेश..

मतदानाच्या दिवशी प्राथमिक टक्केवारी ५८.२३ टक्के होती ती अचानक ६६.५० एवढी कशी वाढली हा सगळ्यांचा प्रश्न आहे. गेल्या पंचवार्षिक कालावधीत महाराष्ट्रात मतदारांची संख्या ३१ लाख वाढली. संख्या लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात ४१ लाख कशी वाढली? प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे. याबाबत न्यायालयीन चौकशी करण्याची यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि त्यातील राजकीय हस्तक्षेप याबाबत नेमकेपणाने बोट ठेवले आहे. यामध्ये निवडणूक आयोग विषयाच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका संवैधानिक संस्थेबाबत असे चित्र निर्माण होणे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे त्याची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली पाहिजे अशी मागणी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मशाल पेटवित शेकडो कार्यकर्ते मशाल घेऊन या मोर्चात सहभागी झाले. माजी आमदार चौधरी, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, संदीप पाटील, महिला आघाडीचे अध्यक्षा सुलोचना वाघ, मुफ्ती हारून नक्वी, तुषार संधानशिव, धनंजय चौधरी आदी पदाधिकारी त्यात अग्रभागी होते. यावेळी महायुती विरोधात घोषणा देण्यात आल्या.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com