Raj Thackrey News: मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अलीकडच्या सभेत त्यांनी विज्ञाननिष्ठ भूमिका मांडली होती. त्याचे राज्यभरात कौतुक झाले. नद्यांची स्वच्छता आणि धार्मिक प्रबोधन म्हणून ठाकरे यांच्या त्या वक्तव्याचे सगळ्यांनीच स्वागत केले होते.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र वेगळाच धडा गिरवला. पक्षाची गेल्या काही वर्षातील स्थिती आणि कामगिरी फारशी प्रभावी नव्हती. त्यावर उपाय म्हणून चक्क वास्तुशास्त्र सांगणार यांचा सल्ला अमलात आणला.
यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पक्षाच्या कार्यालयात अनेक बदल केले. त्यात प्रामुख्याने दरवाजा आणि त्याची दिशा पूर्णता बदलण्यात आली. वास्तुशास्त्रानुसार कार्यालयातील स्वच्छतागृह देखील अन्यत्र हलविण्यात आले. दुरुस्त केलेल्या कार्यालयात वास्तुशास्त्रानुसार पाच पदाधिकाऱ्यांनी सपत्नीक पूजन आणि नवचंडी पूजा करण्यात आली. राज ठाकरे यांनीही या कार्यालयाला भेट दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुरुवातीच्या काळात नाशिकमध्ये विशेष प्रभाव होता. शहरातील तिन्ही आमदार याच पक्षाचे होते. स्वबळावर ३९ नगरसेवक निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महापालिकेत मनसेची सत्ता होती.
त्यानंतर यातील २५ नगरसेवक भाजपासह विविध पक्षांत निघून गेले. त्यानंतर पक्षाला राजकीय घरघर लागली. आता पदाधिकारी नव्या दमाने पुनर्बांधणीच्या कामाला लागले आहेत. दृष्टीने वास्तुशास्त्रानुसार केलेला बदल पक्षाला उभारी देण्यात यशस्वी होईल का! याची चर्चा आहे. कार्यालयाच्या दरवाजाची दिशा बदलल्याने मनसेची राजकीय दशा बदलेल का? याची उत्सुकता आहे.
नूतनीकरण केलेल्या कार्यालयात मोठ्या उत्साहात उद्घाटन वजा कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ही वेळ काढून त्यासाठी उपस्थिती दर्शवली. पक्षाचे नेते दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, ॲड रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांसह पदाधिकाऱ्यांनी सर्व हितचिंतक आणि नागरिकांना निमंत्रित निमंत्रित केले होते.
विशेष म्हणजे या कार्यालयात मनसे आणि शिवसेना मनोमिलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही उत्साहाने हजेरी लावली. उपनेते सुनील, बागुल दत्ता गायकवाड, डी. जी. सूर्यवंशी, बाळा दराडे, महेश बडवे आदींनी भेट दिली. शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मनसेने जोरदार स्वागत केले. बाळा दराडे यांनी तयार केलेल्या ठाकरे + हिंदुत्व म्हणजेच महाराष्ट्र असा संदेश असलेला फोटो यावेळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.