Teachers constitutency 2024 : विखे पाटलांनी घेतली माघार पण कोणीच नाही पाहिली!

Vikhe Patil Politics : नाशिक शिक्षक मतदार संघात आता गुळवे, कोल्हे आणि दराडे यांच्या तिरंगी लढत
Rajendra Vikhe Patil
Rajendra Vikhe PatilSarkarnama

Rajendra Vikhe Patil News : शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत बुधवारी मोठा ट्विस्ट आला. विविध उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता येथे तिरंगी लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. यामध्ये बहुचर्चित आणि प्रमुख उमेदवार प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे माघार घेतली. मात्र त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात न येता त्यांच्या सूचकाने अर्ज मागे घेतला.

डॉ. विखे पाटील यांनी माघार घेतल्याने त्याचा मोठा फायदा अपक्ष उमेदवार संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त विवेक कोल्हे यांना होणार आहे. नगर जिल्ह्यातून ते एकमेव उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. बुधवारी सकाळपासून अतिशय वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्यासाठी भाजप (BJP) च्या धनराज विसपुते आणि निशांत रंधे यांनी माघार घेतली.

विखे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली, ते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात न आल्याने त्यांची माघार कोणीच पाहिली नाही,अशी स्थिती अनेकांची होती.महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे राहिले आहेत. काँग्रेसचे उमेदवार डी. बी. पाटील यांनी आज माघार घेतली. या संदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सकाळीच काँग्रेसच्या माघारीचे वृत्त दिले होते.

विखे पाटील यांनी घेतलेल्या माघारीमुळे आता शिक्षक मतदार संघामध्ये अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे, महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे आणि महायुतीचे आमदार किशोर दराडे अशी तिरंगी लढत होणार आहे. प्रमुख उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे आगामी दोन आठवडे उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये राजकीय घडामोडी आणि नेत्यांच्या भूमिका चर्चेच्या विषय राहतील.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com