Raju Shetty News : राज्य सरकारने नुकतीच राज्यातील दूध उत्पादकांसाठी दरवाढीची घोषणा केली. मात्र या घोषणेनंतरही दूध उत्पादक समाधानी नाहीत. माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत गंभीर आरोप केले आहेत.
राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी घोषणा केली. त्यानुसार दर्जातील दुधाला पाच रुपये प्रति लिटर दर वाढविला.
हा निर्णय घेण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti ) यांनी गंभीर आरोप केले आहेत. शासनाकडून काही मर्जीतल्या लोकांची बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय झाला. खऱ्याखूऱ्या दूध उत्पादकांना या निर्णय प्रक्रियेपासून लांब ठेवण्यात आल, असा दावा शेट्टी यांनी केला.
दूध उत्पादकांचे खरे प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. दुधाला किमान दहा रुपये प्रति लिटर वाढविले पाहिजे. दुधाची भेसळ रोखण्यासाठी शासनाला गंभीर पावले टाकावे लागतील.
सध्याचा अन्न व भेसळ प्रतिबंधक विभाग याबाबत कमकुवत ठरला आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा येत्या सोमवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना Swabhimani Shetkari Saghatana या विरोधात तीव्र आंदोलन उभारी असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.