Raksha Khadse : रक्षा खडसेंचं मोठं पाऊल; रावेर पुन्हा काबीज करण्यासाठी कट्टर विरोधकाच्या घरी

Raver Lok Sabha Constituency : भाजपने रावेरमधून खडसेंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर चंंद्रकांत पाटील नाराज होते. त्यानंतर ते खडसेंच्या प्रचारात सक्रिय नव्हते. आता खडसेंनी थेट भेट घेतल्यानंतर ते प्रचार करणार का, याकडे लक्ष आहे.
Raksha Khadse, Chandrakant Patil
Raksha Khadse, Chandrakant PatilSarkarnama

Jalgaon Political News : रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून खासदार रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांची नाराजी खडसेंच्या विजयात अडसर ठरणार, हे जाणून असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपातील दिग्गज नेत्यांनी पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता खुद्द रक्षा खडसेंनी रावेर पुन्हा काबीज करण्यासाठी त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या पाटलांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. खडसेंनी थेट पाटलांची घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुक्ताईनगर हा आमदार एकनाथ खडसेंचा Eknath Khadse बालेकिल्ला समजला जातो. मात्र या विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये चंद्रकांत पाटलांनी खडसेंचा पराभव केला. त्यानंतर खडसे कुटुंब आणि पाटील यांच्यातील विरोध अधिक वाढल्याचे बोलले जात आहे. त्यातच महायुतीकडून पुन्हा रक्षा खडसेंनी उमेदवारी जाहीर केल्यामुळे चंद्रकांत पाटील नाराज झाले होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्याकडे आपली नाराजी जाहीर केली होती. त्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्याला यश आले नाही.

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे राजी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमिवर रक्षा खडसेंनी Raksha Khadse भेटी - गाठींवर जोर दिल्याचे दिसून येत आहे. यातच कट्टर विरोधक असेलेल्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली. आतापर्यंत पाटलांच्या भूमिकेबाबत शांत असलेल्या खडसेंनी थेट भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमुळे पाटलांची नाराजी दूर होणार का? ते खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार का? आदी प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raksha Khadse, Chandrakant Patil
BJP Politics : दिंडोरीत शरद पवारांच्या कोंडीसाठी भाजपने 'असा' टाकला डाव

दिग्गजांनी केले चंद्रकांत पाटलांच्या मनधरणीचे प्रयत्न

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटलांची Chandrakant Patil मुक्ताईनगर शहरात मोठी ताकद आहे. त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांनी युती धर्म पाळावा, अशी भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरच पाटील नाराज असल्याने भाजपपुढील अडचणी वाढल्या होत्या. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे, गुलाबराव पाटील आदी दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यानंतर खुद्द रक्षा खडसेंनी पाटलांची भेट घेतली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Raksha Khadse, Chandrakant Patil
Ravindra Waikar News : स्टेटमेंट वायकरांचं, लढाई 'परसेप्शन'ची, धक्के एकनाथ शिंदे, अजितदादांना ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com