Karjat Bazar Samiti Results: कर्जत बाजार समितीत राम शिंदे - रोहित पवारांमध्ये मोठी चुरस; शिंदे आघाडीवर...

Karjat Agricultural Produce Market Committee : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Karjat Bazar Samiti Results
Karjat Bazar Samiti ResultsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत.

अहमदनगरमधील कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सकाळपासूनच सुरवात झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Karjat Bazar Samiti Results
Bazar Samiti Results: नगर बाजार समितीत शिवाजी कर्डिलेंनी गड राखला; 18 पैकी 18 जागांवर दणदणीत विजय

सध्या तरी कर्जत बाजार समितीमध्ये भाजप नेते राम शिंदे यांचा गट आघाडीवर असून 18 पैकी 15 जागेचा निकाल हाती आला आहे. यामध्ये राम शिंदे यांच्या गटाला 8 तर रोहित पवारांच्या गटाला सात ठिकाणी आघाडी मिळाली आहे.

Karjat Bazar Samiti Results
Sangamner Bazar Samiti Results: संगमनेर बाजार समितीत आजी-माजी महसूलमंत्र्यात प्रतिष्ठेची लढाई; कोण मारणार बाजी?

उर्वरित तीन जागांची मतमोजणी सुरू असून थोड्याच वेळात कोण बाजी मारणार? ते समोर येणार आहे. त्यामुळे राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

दरम्यान, कर्जत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर हे ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपच्या पॅनलकडून उभे राहिले होते. त्यामुळे राम शिंदे यांच्या या राजकीय खेळीमुळे रोहित पवारांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे आता कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लगालं आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com