Ramdas Athavale Politics: अजित पवार यांच्या दौऱ्याआधीच रामदास आठवलेंची गुगली, केला देवळालीवर दावा!

Ramdas Athavale;Athavale's Google on the eve of Ajit Pawar's visit-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सातत्याने देवळाली या राखीव मतदारसंघावर दावा करीत असतात.
Ramdas Athwale & Ajit Pawar
Ramdas Athwale & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ramdas Athawale News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आज देवळाली मतदारसंघात भूमिपूजनासाठी आले आहेत. त्याच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुगली टाकली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) हा राज्यमंत्री रामदास आठवले यांचा पक्ष महायुतीचा प्रमुख घटक आहे. राज्यमंत्री आठवले सातत्याने सत्तेच्या बाजूने राहतात. सत्ताधारी पक्षाच्या मदतीने पक्षाचा विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

यामध्ये ते प्रत्येक निवडणुकीत जागा वाटपात आपली मागणी रेटतात. शनिवारी नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यमंत्री आठवले यांनी पुन्हा तोच राग आळवला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडे किमान आठ ते दहा जागा मिळाल्याच पाहिजे, असा त्यांचा दावा आहे.

यामध्ये अजित पवार गटाकडे असलेल्या देवळाली आणि भाजपकडे असलेल्या भुसावळ आणि श्रीरामपूर हे तीन मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा त्यांचा दावा आहे. देवळाली मतदारसंघासाठी तर त्यांनी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे हे उमेदवार असल्याचे देखील जाहीर केले.

Ramdas Athwale & Ajit Pawar
BJP Politics: भाजप आमदार तणावात; हरियाणा पॅटर्न म्हणजे आहे तरी काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या आमदार सरोज अहिरे या देवळालीच्या विद्यमान आमदार आहेत. जागा वाटपात पवार गटाला ही जागा मिळणार आहे. यात कोणतीही शंका नाही. आमदार अहिरे यांनी निवडणुकीचा प्रचार देखील सुरू केला आहे.

असे असताना उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी देवळाली मतदारसंघावर दावा केला. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत या मतदारसंघावर आठवले अडून बसतात का? हा देखील चर्चेचा विषय आहे.

राज्यमंत्री आठवले १९९१ पासून काँग्रेस आघाडीच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते प्रत्येक वेळी देवळाली मतदारसंघासाठी आग्रह धरतात. यामध्ये त्यांना एकदाच ही जागा मिळाली होती. तेव्हा विश्वनाथ काळे हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढले होते.

Ramdas Athwale & Ajit Pawar
Chhagan Bhujbal Politics: भुजबळ पोलिसांवर संतापले, मारेकरी पोलिसांनी नव्हे तर लोकांनी पकडलेत!

त्या निवडणूकीत श्री. काळे पराभूत झाले. गेली तीस वर्ष हा मतदारसंघ शिवसेनेचे बबन घोलप आणि माजी आमदार योगेश घोलप यांच्याकडे होता. सध्या तो अजित पवार गटाकडे आहे.

महायुतीच्या जागा वाटपातील ताण तणाव लक्षात घेता विद्यमान आमदारांची जागा सोडण्यास कोणताही पक्ष सहजासहजी तयार होणार नाही. असे असताना राज्यमंत्री आठवले यांनी देवळाली मतदारसंघाची मागणी करून गुगली टाकली आहे का? असे बोलले जाते.

राज्यमंत्री आठवले यांची गुगली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विकेट घेते की, मतदारसंघाचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून सहज केलेली मागणी असा ठरतो, याची उत्सुकता महायुतीतील कार्यकर्त्यांना आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com