Ramdas Athawale News: इकडे रामदास आठवलेंनी लोकसभेचा मतदारसंघ ठरवला; तिकडे शिंदेंच्या खास खासदाराची धडधड वाढली

Shirdi Lok Sabha Constituency: नव्या राजकीय गणितात ‘बिनचूक’ मतदारसंघ शोधून पुन्हा लोकसभेत जाण्याचा आठवलेंचा इरादा आहे.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: दिल्लीत भाजपसोबत जवळीक वाढवलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लोकसभा निवडणूक लढण्याची जोरदार तयारी चालवली आहे. नव्या राजकीय गणितात ‘बिनचूक’ मतदारसंघ शोधून पुन्हा लोकसभेत जाण्याचा आठवलेंचा इरादा आहे.

त्याकरिता जुन्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरणार असल्याचे आठवलेंनी पुन्हा एकदा जाहीर केले. जागांच्या वाटाघाटीत शिर्डीतून आठवले लढल्यास या मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास खासदार सदाशिव लोखंडेंना धक्का बसणार आहे. पण आठवलेंचा हा धक्का केवळ लोखडेंपुरता नसेन; तो शिंदेंनाही जाणू शकतो.

Ramdas Athawale
Shasan Aaplya Dari : जेजुरीसाठी ३५९ कोटी मंजूर; १०९ कोटी कामांचे भूमिपूजन ; मुख्यमंत्र्यांची माहिती

रामदास आठवले यांनी आपला मतदारसंघ निश्चित करत 2024 ची लोकसभा निवडणूक आपण शिर्डी मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा केल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांची धडधड वाढली आहे.

रामदास आठवले यांनी 2009 साली लोकसभेची निवडणूक शिर्डी मतदारसंघातून लढवली होती. मात्र, यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता त्यांना पुन्हा एकदा शिर्डी लोकसभेचे वेध लागले असून शिर्डीतून लोकसभा लढण्याची इच्छा आठवलेंनी बोलून दाखवलीय.

Ramdas Athawale
Supreme Court On Manipur Violence: मणिपूर हिंसाचाराच्या घटनेवरून सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; तीन माजी न्यायाधीशांची समिती नेमली

सध्या राज्यात भाजप आणि शिवसेनेची (शिंदे गट) युती असून खासदार लोखंडे युतीकडून विद्यमान खासदार आहेत. पण आठवलेंना पुन्हा शिर्डी लोकसभेचे वेध लागल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून पक्ष श्रेष्ठींपुढे पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवलेंच्या या इच्छेने शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जाते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन जागा लढवणार असून याबाबतचे आश्वासन देण्यात आले असल्याचा खुलासा देखील आठवलेंनी दिल्लीत बोलताना केला. याबरोबरच आगामी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात 'रिपाई'ला मंत्रीपद देण्यात येईल, असे आश्वासन फडणवीसांनी दिले असल्याचेही आठवलेंनी बोलून दाखविले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com