Raver Loksabha: एकनाथ खडसेंच्या स्वप्नांवर काँग्रेस फेरणार पाणी; पटोले रावेरबद्दल काय म्हणाले ?

Nana Patole On Eknath Khadse: महाविकास आघाडीत जागावाटपासंदर्भात खलबतं सुरू आहेत.
Nana Patole and Eknath Khadse
Nana Patole and Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News: लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेते लोकसभा लढवण्यासंदर्भात इच्छा व्यक्त करताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनीही रावेरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. खडसेंनी इच्छा व्यक्त करताच काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत खडसेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

'काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकण्याचे मेरिट हे काँग्रेसचे आहे. त्यामुळे रावेर लोकसभेची जागा ही काँग्रेसलाच येईल. मेरिटवर ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येईल. मात्र, आम्ही अजून यावर चर्चा केली नाही. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील हेदेखील ही जागा लढवण्याबद्दल बोलू शकतात. पण आम्ही असा आततायीपणा करीत नाहीत,' असा खोचक टोला नाना पटोलेंनी खडसेंना लगावला. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole and Eknath Khadse
Tanker Strike Update : महसूलमंत्र्यांचा फोन येताच चक्रं फिरली; उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला मिळाला दिलासा

खडसे नेमकं काय म्हणाले होते ?

रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ही जागा लढण्यासाठी मी इच्छुक असून रावेरची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास माझ्या नावाचा विचार करावा, अशी विनंती पक्षाला केली असल्याचं खडसेंनी सांगितलं. तर दुसरीकडे भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनीही खासदारकीच्या हॅट्ट्रिकसाठी दंड थोपटले. त्यामुळे सासरा विरुद्ध सून असा सामना रंगणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. पण एकनाथ खडसे यांच्या खासदारकीच्या स्वप्नांवर काँग्रेस पाणी फेरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच महाविकास आघाडीत जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु आहेत. यातच एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली. तर यावरूनच नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यांना खोचक टोला लगावला. त्यामुळे यावर एकनाथ खडसे आता काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Nana Patole and Eknath Khadse
Thackeray Group : 'राजू शेट्टी म्हणजे आयत्या बिळात नागोबा, ठाकरेंनी मला संधी द्यावी, अन्यथा...' : आघाडीत पहिली ठिणगी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com