रावेरचे केळी उत्पादक म्हणाले, धन्यवाद ठाकरे सरकार!

केळीला फळाचा दर्जा मिळाल्याने महाविकास आघाडीतर्फे राज्य शासनाचे अभिनंदन करण्यात आले.
Banana growers at Raver
Banana growers at RaverSarkarnama
Published on
Updated on

रावेर : अनेक वर्षे पाठपुरावा करीत असलेल्या रावेरच्या केळी उत्पादकांच्या (Banana Producers) पाठपुराव्याला अखेर यश आले. केळीला राज्य शासनाने (State Goverment) फळाचा दर्जा दिला. त्यामुळे खुश होऊ शेतकऱ्यांनी केळीच्या घडाची मिरवणूक काढली. यावेळी त्यांनी राज्य सरकारचे अभिनंदन करीत `धन्यवाद उद्धव ठाकरे सरकार` (Uddhav Thakre) असा संदेश दिला. (Banana inclueded in fruit categary by State government)

Banana growers at Raver
पोलिसांच्या नोटीसने मावळते महापौर सतीश कुलकर्णी संतापले!

केळीला फळाचा दर्जा मिळाल्याबद्दल रावेर तालुका महाविकास आघाडीतर्फे शहरातून वाजतगाजत केळीच्या घडाची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी महाविकास आघाडीचा अभिनंदनाच्या ठरावाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

Banana growers at Raver
आमदार सुहास कांदे शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे!

येथील माजी आमदार अरुण पाटील यांच्या संपर्क कार्यालयापासून सजवलेल्या हातगाडीवर केळीचे घड, दर्शनी भागात केळीला फळाचा दर्जा मिळवून देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे अभिनंदनाचे बॅनर लावून ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. केळीला फळाचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल महाविकास आघाडीचा व मुख्यमंत्री यांच्यासह मंत्र्यांचा जयघोष करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मिरवणूक तहसील कार्यालयावर आली.

या वेळी केळीला फळाचा दर्जा देण्याबाबत भाजपच्या वल्गनाच ठरल्या, तर महाविकास आघाडी सरकारने केळीला फळाचा दर्जा देऊन शेतकऱ्यांना न्याय देऊन अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, अटवाडे येथील शेतकरी आर. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन देण्यात आले. यात राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हिताच्या चांगल्या योजना जाहीर केल्या. यात कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ७५ हजार रुपये अनुदान, तसेच केळीला फळाचा दर्जा स्वरूपात रोजगार हमी योजनेत समाविष्ट करून शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, फलोत्पादनमंत्री यांना पाठविण्यात आला आहे. या वेळी राष्ट्रवादी सेवादल राज्य उपाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँगेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश महाजन, तालुकाध्यक्ष नीळकंठ, काँग्रेस आदिवासी सेलचे दिलरुबाब तडवी, काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेमूद शेख, यशवंत धनके, महेश लोखंडे, प्रकाश सुरदास, रामदास लहासे, किसन सपकाळ, गुलशेर तडवी, संजय धोबी, कैलास पाठक, दिवाकर चौधरी, समाधान साबळे, शेख सलीम यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com