रझा ॲकॅडमीने दिली शुक्रवारी मुंबईसह नाशिक बंदची हाक

नाशिकच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना रझा ॲकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
Raza Acadamy given memorandum
Raza Acadamy given memorandum Sarkarnama

नाशिक : त्रिपुरा हिंसेच्या निषेधार्थ रझा ॲकॅडमीतर्फे शुक्रवारी मुंबईसह नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आसाम राज्यातील त्रिपुरा येथे हिंसा घडवून आणली. काही समाजकंटकांकडून तेथील स्थानिक मुस्लीम बांधवांवर अन्याय अत्याचार केले जात आहे. हिंसेत अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे.

Raza Acadamy given memorandum
अमरीशभाई पटेल यांचे बिनिवरोधचे प्रयत्न शिवसेनेने उधळून लावले!

स्थानिक मुस्लीम बांधवांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आसाम राज्य सरकारचा नाकर्तेपणामुळे स्थानिक मुस्लीम बांधवांवर अत्याचार झाले. मुस्लिमांवर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्यात यावे, त्यांना त्वरित संरक्षण देण्यात यावे. हिंसेच्या आड ज्या समाजकंटकांकडून रक्ताची होळी खेळली जात आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करत गुन्हे दाखल करावे. अशा मागण्यासह घटनेच्या निषेधार्थ रझा ॲकॅडमीतर्फे शुक्रवारी (ता.९) नाशिक बंदची हात देण्यात आली आहे.

Raza Acadamy given memorandum
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाने `तीन तलाक` चे प्रमाण कमी झाले

मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये बंद पाळण्यात येणार आहे. शांततेच्या मार्गाने बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी विशेषतः मुस्लिम बांधवांनी सहकार्य करत उत्स्फूर्त बंद पाळावा, असे आवाहन ॲकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. तसेच हिंसेस खतपाणी घालणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी. घटनेची जबाबदारी घेत आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्यांना दोषी ठरवून त्यांच्यावरदेखील कारवाई करावी, अशी मागणी ॲकॅडमीतर्फे करण्यात आली. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी वसीम पिरजादे, एजाज मकरानी, झाकिर हाजी, मुक्तार शेख आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com