BJP Politics: भाजप नेते सत्यपाल सिंग यांचे विधान, 'देश धर्मनिरपेक्ष नव्हे, पंथनिरपेक्ष हवा'

Retd. IPS Satyapal Singh; BJP in given highest priority for security-निवृत्त पोलीस अधिकारी सत्यपल सिंग यांचे धक्कादायक विधान, विरोधी पक्षांवर टीका
Saatyapal Singh
Saatyapal SinghSarkarnama
Published on
Updated on

Satyapal Singh News: निवृत्त आयपीएस अधिकारी सत्यपाल सिंग यांनी आज भाजपच्या प्रचारासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी धक्कादायक विधान केले. "देश धर्मनिरपेक्ष नव्हे, तर पंथ निरपेक्ष हवा" असे ते म्हणाले.

निवृत्त आयपीएस अधिकारी आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन केले. महाराष्ट्रात राज्य शासनाने 18 पगड जातींसाठी महामंडळे स्थापन केली आहेत. विविध घटकांच्या विकासासाठी ते काम करीत आहेत.

राज्यातील विरोधक मात्र कोणताही ठोस मुद्दा घेऊन प्रचारात उतरलेले नाहीत. विरोधकांमध्ये परिवार वाद सुरू आहे. आपल्या परिवाराच्या सदस्यांना राजकारणात स्थिर सावर करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला.

`एमआयएम` चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारतीय जनता पक्षावर धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काम करीत असल्याचा आरोप केला होता. याबाबत सत्यपाल सिंग यांना विचारणा केली असता, खासदार ओवेसी हेच धार्मिक तेढ निर्माण करतात. त्यांचे राजकारण त्यावर सुरू आहे. हा देश धर्मनिरपेक्ष नव्हे तर पंथनिरपेक्ष असायला हवा, असे धक्कादायक विधान त्यांनी केले.

Saatyapal Singh
Malegaon Election: धक्कादायक; मालेगावात हवाला रॅकेट? युवकांच्या खात्यात आले सव्वाशे कोटी!

देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर त्यांनी सबका साथ, सबका विश्वास आणि सबका विकास यासाठी काम करते. हे सिद्ध केले आहे. सध्या देशात प्रत्येकाला सुरक्षा हवी आहे.

भाजपने देशात सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. हा पक्ष सत्तेत आल्यावर बॉम्बस्फोट, दंगली, नक्षलवाद, सीमाबाद संपला आहे. देशाच्या सर्व सीमा सुरक्षित आहेत, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात अलीकडच्या काळात वीस हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे. 138 फॉरेन्सिक प्रयोगशाळा सुरू आहेत. सायबर सुरक्षेवर काम होत आहे. सत्तर हजारांहून अधिक सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

Saatyapal Singh
Raksha Khadse Politics: नणंद रोहिणी खडसेंचा प्रचार करणार का?, मंत्री रक्षा खडसे यांनी स्पष्टच सांगितले...

देशात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झालेली आहे. काही देश विघातक शक्ती कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणू पहात आहे. मात्र देश 2047 पर्यंत आत्मनिर्भर व्हावा, यासाठी भाजपचे काम केले जात आहे.

सध्या देशात अन्नसुरक्षेवर विशेष भर दिला जात आहे. 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य दिले जात आहे. सुरक्षे विषयी काम करताना अन्न, निवारा, घरे, वीज, शौचालय यासाठी सरकारने काम केले आहे. सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षित करून व अर्थसाह्य देऊन मदत केली जात आहे. देशात सध्या 52 कोटी बँक खाते आहेत. त्यामुळे गरिबांच्या विकासाला चालना मिळते असा दावाही त्यांनी केला.

जम्मू- कश्मीर राज्यामध्ये 370 कलम रद्द करण्याचे धाडस केंद्रातील भाजप सरकारने केलं. राम मंदिर बांधण्याचे काम त्यांनी केले. योग शिक्षण व प्रसारावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे आज योग दिन जगभर साजरा केला जातो.

आस्था आणि संस्कृती याविषयी भारतीय जनता पक्षाला अभिमान आहे. त्यामुळेच हा देश धर्मनिरपेक्ष नव्हे तर पंथनिरपेक्ष असायला हवा, असे त्यांनी सांगितले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com