नाशिक : कोरोनाच्या (Covid19)पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासनाने अत्यंत उल्लेखनीय काम केले आहे. तसेच उल्लेखनीय काम सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या लाटेत प्रशासनाकडून होईल. तिसऱ्या लाटेत धोका कमी असला तरी तरी परिस्थिती अद्यापही कोरोना शुन्य झालेला नाही, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.
जिल्ह्यात लसीकरणासह चाचण्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे, नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर व विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील सुमारे ७ लाख लोक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. या वंचित नागरीकांना दुसरा डोस देण्यासाठीचे नियोजन प्रशासनाने प्राथमिकतेने करण्याचे आवाहन करून ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील दोन महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रात लसीकरण व टेस्टींग आठवडाभरात दुपटीने करण्याचे लक्ष्य निश्चित करावे.
जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन ४०२ मेट्रिक टन इतक्या क्षमतेने पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून रुग्णालयातील उपलब्ध बेडसंख्याही कोरोनाच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. या प्रशासकीय तयारीचे कौतुक करताना मागच्या दोन लाटांच्या तुलनेत रुग्णालयातून दाखल रूग्णांचे व ऑक्सिजनवर असलेल्या रूग्णांची संख्या कमी असल्याबद्दलही समाधान व्यक्त केले.
शाळा सुरू होताना खबरदारी
शाळा सुरू करण्याचा आग्रह सर्वच पातळीवरून होताना दिसतो आहे, त्यामुळे शासन-प्रशासनावर या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. परंतु शाळकरी मुले बाधित होणार नाहीत यासासाठीच्या उपाययोजना व खबरदारी ही शासन-प्रशासनाबरोबरच शाळा प्रशासन, पालकांचीही जबाबदारी असून ज्या शाळांमध्ये मुले बाधित होतील तेथे शाळा तात्काळ बंद कराव्यात तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांमध्ये आजाराची सौम्य व तीव्र लक्षणे आढळल्यास त्यांना शाळेत पाठवू नये. असेही आवाहन या बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी केले.
‘नो व्हॅक्सिन नो एन्ट्री’
मॉल्स, मोठी व्यापारी संकुले व किरकोळ दुकानदारांनी लसीकरण प्रमाणपत्राची शहाविषयी केल्याशिवाय ग्राहकांशी कुठलाही व्यवहार करू नये असे सांगून पालकमंत्री यांनी जी दुकाने या याची प्रभावी अंमलबजावणी करत नसल्याचे दिसून येईल त्यांच्यावर बंद/सील करण्याची कठोर कारवाई करण्याची संबंधित स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेने करावी असे यावेळी सांगून लग्न समारंभ ही कोरोना वाढीच्या संक्रमणातील मोठी सुप्रभात स्प्रेडर असून एखाद्या दुकानात ग्राहक काम संपले तर लगेच निघून जातो परंतु लग्न समारंभातून तासन् तास लोक विनामास्क वावरताना दिसतात. तसेच मंगल कार्यालये व लॉन्स यांच्यावर ५० च्या उपस्थितीने बंधन आल्याने आता लोक वाड्या, वस्त्यांवर खुल्या वातावरणात गर्दी करताना दिसतात. अशा कार्यक्रमांवर वॉच ठेवून दंडात्मक कारवाई करण्यच्या सूचना पोलीस यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.