
Rohit Pawar criticism Ram Shinde : भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना पवार काका-पुतण्यामधील भावकी ही टाॅर्चर करू लागली आहे. तशी त्यांनीच मत व्यक्त केलं आहे. भाजपनं एवढ्या मोठ्या पदावर विराजमान केलेल्या प्रा. शिंदेंना पवार यांच्या भावकीवर भाष्य करण्याचे अर्थ आता वेगवेगळे काढले जाऊ लागले आहे.
यातला पहिला अर्थ, त्यांचे राजकारणातील प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सांगून प्रा. राम शिंदेंची कोंडी केली आहे. एकप्रकारे प्रा. राम शिंदेंना उघडचं पाडलं आहे. रडत राहिल्यावर फायदा होतो, तेच प्रा. राम शिंदे करत आहेत, असा टोला लगावून आमदार पवारांनी प्रा. राम शिदेंना चांगलच डिवचलं आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, "2019ला आपण त्यांचा पराभव केला. ते सातत्याने रडत राहिले, त्यांना विधान परिषद मिळाली. 2024 ला पुन्हा त्यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. त्यावेळी देखील रडले आणि त्यांना एवढं मोठं विधान परिषदेचे सभापतीपद मिळालं." आता ते का रडतात तेच समजेना? कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला जातील आणि त्यांची खुर्ची आपणांस मिळावी म्हणून ते प्लॅन आखत असावे, असे दिसते आहे, असे म्हणत रोहित पवारांनी राम शिंदेंना डिवचलं.
सांगली इथल्या एका कार्यक्रमात आमदार रोहित पवारांनी आपले काका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे राजकीय क्षेत्रात गावकीकडे पाहत असताना भावकीकडे देखील लक्ष द्यावं, अशी साद घातली. यावर अजितदादांनी रोहित पवारांना उत्तर देताना भावकीकडे लक्ष दिले म्हणूनच किमान आमदार तरी झाला, असा टोला लगावला.
परंतु पवार काका-पुतण्यांमधील या भावकीचे पडसाद, कर्जत-जामखेडमध्ये उमटले. भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या भावकीवर प्रतिक्रिया देताना, अजितदादांना टार्गेट केलं. अजित पवार हे महायुतीत आहे. त्यामुळे प्रा. राम शिंदेंनी टायमिंग साधून, अजित पवार असे विधान करून आपल्याला टाॅर्चर करत असल्याचं मोठं विधान केलं.
प्रा. राम शिंदे यांचे, असे विधान आल्यावर त्यावर आमदार रोहित पवार प्रतिक्रिया देणार नाही असे होणार नाही. परंतु रोहित पवार यांनी राम शिंदेंच्या रडण्यामागे मोठा प्लॅन असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली. प्रा. राम शिंदे रडून-रडून, बरचं काही पदरात पाडून घेतलं आहे. आता मुख्यमंत्री दिल्लीला गेल्यानंतर त्यांच्या मागे त्यांची खुर्ची आपल्याला मिळेल, असा त्यांचा प्लॅन असू शकतो, असे म्हणून खळबळ उडवून दिली.
पवार काका-पुतण्याच्या भावकीवर भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अजित पवार आणि रोहित पवार यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. अजितदादांनी रोहित पवारांना कर्जत-जामखेडच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे महत्वाचे घटक असताना कशी अप्रत्यक्ष मदत केली, याचा दोनदा कबुलीजबाब दिला आहे. ते असे वक्तव्य करून मला 'टॉर्चर' करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत आपण पुन्हा एकदा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर टाकून योग्य तो निर्णय घ्यावा, असे सांगणार आहोत, असे म्हटले होते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.