Rohit Pawar Won Election : भाजपच्या राम शिंदेंनी रोहित पवारांना विजयासाठी झुंजवलं; पण...

Rohit Pawar Won Karjat Jamkhed Assembly Election 2024 final result : कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या अटीतटीची लढत झाली.
Rohit Pawar 3
Rohit Pawar 3Sarkarnama
Published on
Updated on

Karjat Jamkhed Assembly Election 2024 final result : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अवघ्या 1 हजार 255 मतांनी विजय मिळवला.

परंतु भाजपचे राम शिंदे यांनी फेरमोजणीची मागणी केली. त्यामुळे निकालाची घोषणा लांबणीवर पडली. मजमोजणीच्या सुरवातीपासून निकालाची उत्कंठा शिगेला पोचत होती. त्यामुळे दोन्ही उमेदवार मतमोजणी केंद्रावर तळ ठोकून होते.

मतमोजणीच्या सुरवातीलापासून निकालाची उत्सुकता ताणून धरली. राम शिंदे कधी पुढे असायचे, तर रोहित पवार (Rohit Pawar) पुढे असायचे. शेवटला असं वाटत होते की, राम शिंदे विजय खेचून आणतील. कर्जत-जामखेड मतदारसंघात 26 फेऱ्या झाल्या. शेवटच्या फेरीत रोहित पवार 391 मतांची आघाडी होती. परंतु राम शिंदे यांनी फेर मोजणीचा अर्ज दिला. त्यामुळे निकालाची उत्सुकता अधिकच ताणली गेली. यानंतर फायनल मतमोजणीनंतर रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 688 मते मिळाली. राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली. राम शिंदे यांचा 1 हजार 255 मतांनी पराभव झाला.

Rohit Pawar 3
Kashinath Date Won Election : अजितदादांच्या काशिनाथ दातेंकडून खासदार लंकेंना धोबीपछाड; राणी लंकेंचा पराभव

ईव्हीएम (Evm) मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. बिघाड झालेल्या मशीनच्या स्लीपची मोजणी करण्यात येत आहे. दरम्यान, राम शिंदे यांनी फेरमोजणीचा अर्ज दिल्याने रोहित पवार देखील मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. त्यामुळे मतदार केंद्रावर राम शिंदे आणि रोहित पवार आमने-सामने आले होते. शेवटी रोहित पवार यांचा 1 हजार 255 मतांनी विजय झाल्याचे घोषित करण्यात आले.

Rohit Pawar 3
Monika Rajale Won Election : भाजपच्या मोनिका राजळेंची विजयाची हॅटट्रिक; ढाकणे, घुलेंना पराभवाची धुळ चारली

शिंदे-पवार यांच्यातील 2019च्या निकालातील अंतर

कर्जत-जामखेड विधानसभा जागेसाठी महायुतीने भाजपकडून प्रा. राम शंकर शिंदे यांना उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीतील रोहित पवार यांना उमेदवारी दिली होती. 2019च्या विधानसभा निवडणूक निकालात कर्जत-जामखेडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी जिंकली होती. कर्जत-जामखेड मतदारसंघात विजय-पराजयाचे अंतर 43 हजार 347 इतके होते.

2019 आणि 2014 मधील राजकीय स्थिती

2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच या मतदारसंघावर विजय मिळवला. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी विजयी झाले. रोहित पवार शरद पवार यांचे नातू आहेत. 2019 मध्ये भाजपचे दोन वेळा आमदार राहिलेले राम शिंदे यांचा पराभव करत त्यांना विजय मिळवला. रोहित पवार यांना 1 लाख 35 हजार 824 मते मिळाली, तर राम शिंदे यांना 92 हजार 477 मते मिळाली. कर्जत-जामखेड मतदारसंघावर भाजपचा 25 वर्षांपासून राज्य आहे. 1995, 2000, 2005 मध्ये भाजपाचे सदाशिव लोखंडे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये भाजपचे राम शिंदे यांना विजय मिळाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com