Rohit Pawar News : ''विखे आणि शिंदेंनी एकत्र बसावं आणि...''; राष्ट्रवादीच्या रोहित पवारांचा खोचक टोला

Ahmednagar Politics News : ...म्हणून दुसऱ्याचं महत्वं कमी करायचा प्रयत्न केला जात असेल!
Radhakrishna Vikhe Patil, Rohit Pawar, Ram Shinde
Radhakrishna Vikhe Patil, Rohit Pawar, Ram Shinde Sarkarnama

Ahmednagar : जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप यांना ९-९ अशा समसमान जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर या कृषी उत्पन्न बाजार समितीत चुरस मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र, कुणाचाही सदस्य न फुटल्यानं पुन्हा समान सदस्य झाले. त्यानंतर चिठ्ठीने भाजपाचा सभापती तर राष्ट्रवादीचे उपसभापती झाला. मात्र, यानंतर अहमदनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.

यात दोन्ही बाजूनं आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वाद चांगलाच चिघळला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदेंना खोचक टोला लगावला आहे.

Radhakrishna Vikhe Patil, Rohit Pawar, Ram Shinde
Political News: गणेश सहकारी कारखाना : कोल्हेंच्या भूमिकेकडे लक्ष, विखे-पाटलांसोबत जाणार की विरोधात दंड थोपटणार !

आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी माध्यमांशी सोमवारी (दि.२२) संवाद साधला. यावेळी त्यांनी विखे शिंदे वादावर भाष्य केलं. पवार म्हणाले, विखे आणि शिंदेंनी एकत्र बसावं आणि कोण मोठा नेता हे ठरवावं. ते कार्यकर्ते स्वीकारतील. येत्या काळात मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा असावी. त्यांचं कर्तृत्व किती हे दूनियेनं पाहिलं आहे. जर मंत्रिपद मिळालं तर मी आमदार आहे म्हणूनच असेल. मंत्रिपद मिळालं तर पालकमंत्री कोण हा प्रश्न येणार आहे. म्हणून दुसऱ्याचं महत्वं कमी करायचा प्रयत्न केला जात असेल. पण आधी त्यांनी कोण मोठा नेता हे ठरवावं असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.

नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीत पक्षाविरोधी काम केल्याचा थेट आरोप राम शिंदेंनी केला आहे. एवढंच नाही तर खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची छुपी युती असल्याचा खळबळजनक आरोपही राम शिंदेंनी केला होता. याचा आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे अहवाल सोपवणार असल्याचा इशाराही शिंदे यांनी दिला होता.

Radhakrishna Vikhe Patil, Rohit Pawar, Ram Shinde
Ahmednagar News : अभिमानास्पद! अमेरिकेतील 'ELLKAY' कंपनीच्या अध्यक्षपदावर मराठमोळा चेहरा

राम शिंदे नेमकं काय म्हणाले होते ?

राम शिंदे(Ram Shinde) म्हणाले, जामखेड बाजार समितीचे सभापतीपद आमच्याकडे येईल असा विश्वास होता, मात्र राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी पक्षाच्या विरोधात काम केले. या गोष्टी वरिष्ठांच्या कानावर घातल्या असून याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाईल. विधानसभेतही विखेंनी विरोधात काम केलं होतं, आताही विरोधात काम केलं, असल्याचा गौप्यस्फोट राम शिंदे यांनी केला आहे. एवढच नाही तर आमचा पक्ष भाजप आहे, काँग्रेस नाही, असा टोलाही राम शिंदे यांनी लगावला आहे.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाव्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप यांना ९-९ अशा समसमान जागा मिळाल्याने या कृषी उत्पन्न बाजार समितीत आणखी चुरस वाढली होती. कुणाचाही सदस्य न फुटल्याने पुन्हा समान सदस्य झाले. त्यानंतर चिठ्ठीने भाजपाचा सभापती तर राष्ट्रवादीचे उपसभापती झाले.

Radhakrishna Vikhe Patil, Rohit Pawar, Ram Shinde
Sameer Wankhede News : ‘भागवतांच्या भेटीनंतरच वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा का? : दाल में कुछ काला है...’

विखे पाटलांचं प्रत्युत्तर

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राम शिंदेंच्या आरोपांना उत्तर दिले. विखे पाटील म्हणाले, '''राम शिंदे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर त्यांच्याशी मी स्वत: बोलेल. त्यांचे काही समज-गैरसमज असतील तर त्यांनी माझ्याशी चर्चा करायला काहीच हरकत नव्हती. थेट माध्यमांशी बोलणं योग्य नाही.

त्या संदर्भात मी त्यांच्याशी स्वत: संपर्क करेल, त्यांच्याशी चर्चा करेल, त्यांना कुणी चुकीची माहिती दिली. तो पक्षाअंतर्गत विषय आहे, तो एकत्र बसून सोडवू असं विखे म्हणाले होते. पक्ष नेतृत्वाकडे त्यांनी जी काही तक्रार केली असले त्या संदर्भात आम्ही आमची भूमिका मांडू, शेवटी हा पक्षाअंतर्गत विषय आहे. तो लोकांमध्ये येणे योग्य नसल्याचे'' विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com