RPI And Mahayuti : 'RPI'ची आमदारकीसाठी धडपड, सन्मान अन् इशारा; महायुती दखल घेणार का?

Shrirampur assembly seat demand from RPI : राज्यात 12 आणि नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा जागेची 'RPI'ने सन्मानाने मागणी केली आहे.
RPI And Mahayuti
RPI And MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पक्षाचा एकतरी आमदार असावा, यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सरसावली आहे. राज्यात 12 जागांसह नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने दावा ठोकलाय.

उमेदवार निवडून आणण्याचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चंग बांधला असून, महायुतीकडून सन्मानाची अपेक्षा व्यक्त केली आहे. श्रीरामपूरची जागा न मिळाल्यास नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात रिपाईची ताकद दाखवून देण्याचा इशारा रिपाईनं दिला आहे.

विजय वाघचौरे यांनी रिपाईला भाजप (BJP) मित्रपक्षाने राज्यात 12 जागा द्याव्यात, अशी मागणी पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपकडे केली आहे. यात सर्वप्रथम श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची जागा ही रिपाईला सोडवी, अशी आग्रही मागणी आहे. रिपाईला श्रीरामपूर विधानसभेची जागा सोडली नाही, तर नगर जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात आम्हाला पर्याय खुला आहे. प्रत्येक मतदारसंघात रिपाईचा उमेदवार उभा करण्याचा इशारा विजय वाकचौरे यांनी दिला.

RPI And Mahayuti
Ahmednagar Politics : शरद पवारांना विवेक कोल्हे भेटताच, भाजपच्या पोटात का उठला गोळा?

रिपाईचे (RPI) जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांनी पक्षाला चिन्हं मिळाल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आता पक्षाच्या सभासद नोंदणीसाठी मोहीम राबवावी आणि पक्षशिस्तीचे पालन करावे, असे आवाहन केले. तोपर्यंत कुठल्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ नये, गेल्यास त्याची हकालपट्टी करण्यात येईल, असा इशारा भालेराव यांनी दिला.

RPI And Mahayuti
Unmesh Patil Politics: नार-पार गिरणा प्रश्नावर खानदेशच्या रिक्षा चालकांचे कल्याणमध्ये आंदोलन!

नगर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बूथ कमिट्यांचा आढावा घेण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. नगर जिल्ह्यातील एक जागा मागत असलो, तरी प्रत्येक गावात जाऊन पक्षाला पोचवा. विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र रणनीतीच्या बैठका घेऊन, त्यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना सहभागी करून घेण्याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या.

मंत्री विखेंना शिष्टमंडळ लवकर भेटणार

श्रीरामपूर विधानसभेसाठी जागेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घ्यावी. त्यासाठी स्वतंत्र शिष्टमंडळ तयार करावे. ही भेट घेण्यापूर्वी श्रीरामपूरमधील रिपाईच्या ताकदीचा अहवाल तयार करावा, असे जिल्हाध्यक्ष सुशील थोरात यांनी सांगितले. हा अहवाल पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना देखील पाठवला जाणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर नगरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक श्रीरामपूर इथं झाले. राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राज्याचे नेते राजाभाऊ कापसे बैठकीला उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com