Rahuri Assembly Constituency: शिवाजी कर्डिलेंची डोकेदुखी वाढली; सत्यजित कदम म्हणाले, 'भाजपने शब्द फिरवला, आता माझे कार्यकर्ते...'

Satyajeet Kadam Vs Shivaji Kardile: अहिल्यानगरमधील राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील भाजपचे सत्यजित कदम यांनी शिवाजी कर्डिलेंना उमेदवारी जाहीर होताच, वेगळी भूमिका घेतली आहे.
Satyajeet Kadam
Satyajeet Kadam Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपबरोबर एकनिष्ठ असलेले सत्यजित कदम यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याविरोधात बंडाचा इशारा दिला. भाजपने उमेदवारांची काल पहिली यादी जाहीर करताच, माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि त्यांचे चिंरजीव सत्यजित कदम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.

"गेल्यावेळेस उमेदवारी मागितली होती. त्यावेळी पुढच्या वेळी नक्की उमेदवारी देणार, असे सांगून थांबवले. आता तसं होणार नाही. माझ्याबरोबर कार्यकर्त्यांची फौज आहे, कार्यकर्ते म्हणतील, तेच राहुरी मतदार संघात होईल", असा इशारा सत्यजित कदम यांनी दिला.

भाजपने (BJP) विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. यात राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघासाठी नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी व भाजपाशी एकनिष्ठ असलेले सत्यजित कदम यांनी भाजपच्या या निर्णयावर पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली.

Satyajeet Kadam
Jayashree Thorat : 'खबरदार, माझ्या बापाबद्दल बोललात'; जयश्री थोरात म्हणाल्या, 'आता शिर्डी पण जिंकणार'

सत्यजित कदम यांनी भाजपच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या (Election) तयारीत असलेले सत्यजित कदम दोन दिवसांनी निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते. कार्यकर्ते काय सांगतिल त्याप्रमाणे निर्णय होईल. मात्र बार्गेनिंग पाँवर वाढविण्यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न आहे की खरोखरच ते पक्षविरोधी भूमिका घेणार हे बघावे लागेल.

Satyajeet Kadam
TOP Ten News - भाजपची उमेदवार यादी जाहीर; ज्योती मेटेंनी हाती घेतली 'तुतारी' , कपिल पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

भाजपमध्ये नाराजी आहे

सत्यजित कदम म्हणाले, "राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघातून माझे वडील चंद्रशेखर कदम भाजपकडून दोन वेळा आमदार राहिले आहेत. तीन पिढ्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आम्ही एकनिष्ठ आहोत. मतदारसंघात कार्यकर्त्यांचे जाळं आहे. यातूनच पक्षाकडे गेली दोन टर्मपासून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत.

गेल्यावेळी उमेदवारी मागितली, तर पुढच्यावेळी नक्कीच विचार करू, असा शब्द देण्यात आला होता. त्यानुसार थांबलो". आता मात्र भाजप पक्षाने पुन्हा शब्द फिरवला. या निर्णयामुळे माझ्यासह भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आता मी कार्यकर्त्यांवर निर्णय सोडला आहे. कार्यकर्ते म्हणतील, तसा या निवडणुकीला समोरे जाऊ, असे सांगत सत्यजित कदम यांनी शिवाजी कर्डिलेंविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे.

आत्ताची भाजप बदलली आहे

सत्यजित कदम यांचे वडील माजी आमदार चंद्रशेखर कदम हे देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होते. चंद्रशेखर कदम म्हणाले, "मी संघाचा कार्यकर्ता आणि तोही एकनिष्ठ आहे, हे सांगण्याची आम्हाला आवश्यकता नाही. जनसंघापासून आम्ही काम करीत आहोत. मला पक्षाने आदेश दिल्याने मी दोन वेळा या मतदारसंघाचा आमदार झालो. माझ्या रूपाने पहिल्यांदा राहुरी मतदार संघामध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला.

मात्र मतदार संघाचे विभाजन झाल्यानंतर मी स्वतः शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देण्यासंदर्भात प्रयत्न केले". सत्यजित मागच्या वेळी देखील इच्छुक होता व यावेळी त्याला नक्की तिकीट मिळावे, ही माझी देखील इच्छा होती. मात्र आत्ताची भाजप बदलली आहे, असे मला वाटते. त्यामुळे यावेळी सत्यजित व त्याच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य असेल व त्याला माझा पाठिंबा असेल, असे चंद्रशेखर कदम यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com