खडसेंना चकविण्यासाठी गिरीश महाजनांनी १५ मिनिटांत नियमच बदलला!

एकनाथ खडसेंचा आरोप राज्यातील सरकारकडून दूध संघाच्या निवडणुकीत हस्तक्षेप
Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse & Girish MahajanSarkarnama

जळगाव : जळगाव जिल्हा दूध उत्पादक (Jalgaon Milk fedration election) संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी राजकीय (Ruling party BJP) दबावाचा वापर करून नियमांची मोडतोड करीत आहेत. तालुका मतदारसंघाच्या यादीत असलेल्या उमेदवाराला त्याच तालुक्यात उमेदवारी करण्याचा नियम होता. मात्र, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या १५ मिनिटांत नियम बदलला. केवळ सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या (In the intrest of MLA) हितासाठी हे झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. (NCP Leader Eknath Khadse made aligation on BJP in Jalgaon cooperative election)

Eknath Khadse & Girish Mahajan
दूध संघाच्या चौकशीतील परदेशींना निलंबीत करा!

नियम बदलून कोणत्याही तालुक्यातील मतदाराला कोणत्याही तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा नियम अमलात आणून आमदारा मंगेश चव्हण यांचा मुक्ताईनगर तालुक्यातून अर्ज दाखल केला असल्याचा आरोप श्री खडसे यांनी केला.

Eknath Khadse & Girish Mahajan
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींमुळे त्यांचे सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं स्वप्न पूर्ण होणार..

जळगाव येथील मुक्ताई निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे उपस्थित होत्या.

श्री. खडसे म्हणाले, की जिल्हा दूध संघ आपल्या नेतृत्वाखाली ऊर्जितावस्थेत आला आहे. त्यामुळे आज संघाचा संचालक होण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली. राज्याचे मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांनाही संचालक होण्याचा मोह झाला आहे. त्यामुळे त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

चव्हाणांची उमेदवारी अन्‌ दबाव

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून दाखल केलेल्या उमेदवारीबाबत आमदार खडसे म्हणाले, की तालुक्याच्या मतदारसंघातील यादीत उमेदवाराचे नाव असेल, तर त्याच मतदारसंघातून उमेदवारी करता येते, असा नियम होता. मात्र, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या १५ मिनिटांत नियम बदलून कोणत्याही तालुक्यातील उमेदवाराला कोण्यातीही तालुक्याच्या मतदारसंघात निवडणूक लढता येईल, असा नियम करण्यात आला व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून उमेदवारी दाखल केली. वास्तविक सत्ताधाऱ्यांनी राजकीय दबाव आणून ही उमेवारी दाखल केली आहे. विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात विरोधकांना तालुक्यातील उमेदवार न मिळाल्याने राजकीय दबाव आणून उमेदवारी दाखल करण्याचा नियम बदलण्यात आला. याबाबत आपण हरकत दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी लढणार

जिल्हा दूध संघातील पॅनलबाबत आमदार खडसे म्हणाले, की आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार आहोत. सर्व मतदारसंघांत आमच्या आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता आमचे पॅनल तयार झाले आहे. खडसे वगळून सर्वपक्षीय आघाडी करण्याबाबत विरोधकांनी केलेल्या अवाहनाबाबत बोलताना ते म्हणाले, की मी उमेदवारी दाखल केलेली नाही. विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी सहा वर्षांत अत्यंत चांगले काम केल्यामुळे त्या उमेदवारीच्या हक्कदार आहेत. त्यामुळे खडसेंना वगळून सर्वपक्षीय पॅनल होऊच शकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com