सत्ता तर सोडाच, `आप`ची अनामत वाचविणे कठीण दिसते!

सचिन अहिरे म्हणतात, माझे निलंबण म्हणजे `आप` पक्ष संपविण्याचे कारस्थान!
Sachin Ahire, AAP Party

Sachin Ahire, AAP Party

Sarkarnama

नाशिक : शहरात आप (Aam Admi party) पक्षात एक चांडाळ चौकडी काम करीत आहे. त्यांनी पक्ष संपविण्याचा विडा उचलला असून आगामी महापालिकेत विजय तर दूरच या पक्षाच्या उमेदवारांना अनामत रक्कम वाचविणेही कठीण जाईल. कार्याध्यक्ष जितेंद्र भावे (Jitendra Bhave) हे या पक्षाचे मालक असल्यासारखे वागत असल्याचा आरोप, पक्षातून निलंबित केलेल्या सचिन अहिरे (Sachin Ahire) यांनी म्हटले आहे.

<div class="paragraphs"><p>Sachin Ahire, AAP Party</p></div>
दिलीप वाघ करणार राष्ट्रवादीच्या गद्दारांचा 'करेक्ट' बंदोबस्त!

जो तळागाळात जाऊन काम करतो, त्याचे निलंबन. हा कुठला कायदा आहे. त्याला स्वातंत्र्य नाही, त्याने उडायचे नाही काय?. त्यांचे पंख का छाडले जात आहेत, असा सवाल त्यांनी केला.

सातत्याने फेसबूक लाईव्ह करणारे अहिरे यांनी याबाबत एक व्हीडीओ व्हायरल केला आहे. तो चर्चेचा विषय आहे. त्यात ते म्हणाले, या पक्षामधील जुनी कार्यकारीणी अस्तित्वात होती. अण्णा हजारे यांचे आंदोलन झाले. त्यावेळेपासून ते सक्रीय आहेत. त्यांनी आम आदमी पक्ष स्थापन केला. तेव्हापासून ते सक्रीय आहेत. त्यांनी पक्ष मोठा केला. जितेंद्र भावे यांनी त्यांना शांत बसवले. त्यांना सांगितले, आम्ही काम करू, म्हणजे हे काय आम आदमी पार्टीचे मालक आहेत का? हे राजकारणातील आतंकवादी आहेत. ही राजकारणातील वाईट प्रवृत्ती आहे. मला तर वाटते हे आम आदमी पार्टीला संपविण्यासाठी अन्य पक्षातून आलेली मंडळी आहे का?.

<div class="paragraphs"><p>Sachin Ahire, AAP Party</p></div>
एसटी बंद, डेपो बंद, बसेसची तोडफोड.. कुठे चालला आहे हा संप?

श्री. अहिरे म्हणाले, मी पक्षाचा तळागाळात काम करणारा कार्यकर्ता होतो. माझ्या प्रभागात अक्षरशः वीस वीस वर्षे रेंगाळलेले प्रश्न मी पाठपुरावा करून सोडवले. कचऱ्यात उभे राहून कचरा उचलला. हे करताना मला मुंग्या चावल्याने अक्षरशः पाय सुजले होते. सहा सहा महिने लाईट बंद होते. प्रशासनाला धारेवर धरल्यावर त्यांनी ते सुरु केले. प्रभाग ३ चे लोकप्रतिनिधी काम करीत नाहीत, ही जनतेची ओरड होती. त्यामुळे मी प्रभागात जाऊन काम करीत होतो. मात्र मला सातत्याने इकडे जाऊ नका. तिकडे जाऊ नका. मिडीयाकडे जाऊ नका, अशी विविध बंधने सातत्याने लादण्यात येत होती. एककल्ली वागता, असे आरोप करण्यात आले. मात्र मग मी काम करताना ही मंडळी का मदतीला आली नाही, असा प्रश्न त्यांनी केला.

व्होकार्ट रुग्णालयात जितेंद्र भावे यांनी अर्धनग्न आंदोलन केले, तेव्हा पक्षाची शिस्त मोडली नाही का?. मी जर जनतेचे प्रश्न मांडले, माध्यमांकडे गेलो तर तक्रार आणि भावे यांनी केले ते नियमात बसते काय? असा प्रश्न त्यांनी केला. मी आम आदमीचा काय कायदा मोडला आहे. आता आम आदमी पक्षात चांडाळ चौकडी आलेली आहे. त्यांना घेऊन हे लोक फिरतात. हे लोक सत्तेत येणार आहे का? सत्ता तर दुर, त्यांची अनामत रक्कम राहते की नाही, याचीच शंका आहे. या लोकांमुळे आम आदमी पार्टीला उभारी येण्याऐवजी संपायला लागली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांचा हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

दरम्यान याबाबत पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र भावे याविषयी म्हणाले, श्री. अहिरे यांच्या एक नव्हे तर शंभर चुका आहेत. त्यांना निलंबित केल्यावर त्यांनी पक्षाकडे खुलासा करायला हवा होता. याऐवजी ते समाज माध्यमांवर पक्षाच्या विरोधात बोलत आहेत. त्यांनी पक्षाला कायमचा राम राम असे संदेश टाकला आहे. त्यामुळे त्याने पक्षाची सहानुभूती गमावली आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com