Nashik News: सदाभाऊ खोत यांची गर्जना हवेतच विरली!

रूई (निफाड) येथील शेतकरी परिषदेत केलेली मंत्र्यांना कांदा ज्यूस पाजणार ही गर्जना खरी होती की खोटी?
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama

लासलगाव : (Niphad) कांदा दर घसरणीबाबत राज्यातील भाजप (BJP) -शिंदे सरकारने (Eknath Shinde) तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने सरकार आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष सत्तेच्या साठमारीत मशगुल आहेत. शेतकऱ्यांकडे (Farmers) लक्ष द्यायला त्यांना वेळ नसल्याचे चित्र आहे. या संदर्भात सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्न न सोडविल्यास सत्ताधारी मंत्र्यांना कांदा ज्यूस पाजीन ही घोषणा केली होती. मात्र त्यांना त्याचा विसर पडलेला दिसतो, असे शेतकरी बोलत आहेत. (Sadabhau Khot Farmers forget his warning to ministers on onion price issue)

रुई (ता. निफाड) गावात जून २२ मध्ये सदाभाऊ खोत यांनी कांदा परिषद घेऊन त्यावेळेस सरकारने कांदा अनुदान न दिल्यास कांदा ज्यूस पाजू असा इशारा दिला होता. सध्याची परिस्थिती पाहता खोत यांना याचा विसर पडल्याचे दिसत आहे. सदाभाऊ कोत आता गप्प का असा प्रश्‍न कांदा उत्पादकांनी उपस्थित केला आहे.

Sadabhau Khot
Budget : मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा मोठा डाव : विधानपरिषद शिवसेनेवर ताबा मिळवण्याच्या हालचाली!

"जागर शेतकऱ्यांचा आक्रोश कांदा उत्पादकांचा" म्हणत ५ जून २०२२ ला संपूर्ण राज्याचे लक्ष लागले ते निफाड तालुक्यातील रुई गावात होणाऱ्या कांदा परिषदकडे. तब्बल ३९ वर्षानंतर झालेल्या या परिषदेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला ५ रुपये किलो अनुदान मिळावे याकरिता माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरत कांदा दराबाबत एक आठवड्याची मुदत देत आहोत. त्यानंतर मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

यानंतर लासलगाव येथे कांद्याला हमीभाव व अनुदानासाठी प्रहार जनशक्तीने केलेले आंदोलन तसेच येवला येथील कांदा उत्पादन आणि व्यापार यासाठी झालेले आंदोलन. या आंदोलनाची चर्चा राज्यात जोरात झाली. मात्र अद्यापपर्यंत कांद्याला अनुदान मिळावे म्हणून असा कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. आता तर ५० पैसे किलो कांद्याला दर मिळत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

Sadabhau Khot
ZP : आता कॉंग्रेस करणार भाजपच्या काळातील फर्निचरची चौकशी, राजकारण तापले !

राज्य सरकारने कांद्याला अनुदान न दिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंत्रालयासमोर आंदोलन करून मंत्र्यांना कांदा ज्यूस पाजू असा इशारा देणारे सदाभाऊ मंत्र्यांना केंव्हा ज्यूस पाजनार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com