Dhule Congress Agitation : राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारची वैचारीकता व कृती यात मोठा फरक आहे. त्यामुळे अनेक विघ्नसंतोषी शक्तींचे मनोबल वाढले आहे. त्याचाच एक भाग म्हणून संभाजी भिडे यांनी राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्याविषयी अत्यंत गलीच्छ वक्तव्य केले आहे. त्यामुळे देशवासीयांची भावना दुखावल्याने भिडे यांनी तातडीने अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे. (Congress workers Protest in dhule under the leadership of MLA Kunal Patil)
यासंदर्भात काँग्रेसचे (Congress) आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्या नेतृत्वाखाली धुळे (Dhule) येथे निदर्शने करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) पुतळ्यासमोर निदर्शने झाली. त्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी आमदार पाटील यांनी संभाजी भिडे यांचा निषेध केला. ते म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशासाठी सर्वोच्च त्याग केला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी या अत्यंत विशाल देशातील विखुरलेल्या समाजघटकांना एकत्र केले. सबंध देश त्यांच्या नेतृत्वाखाली संघटीत होऊन त्यांनी ब्रिटीश सरकारविरोधात आंदोलन करून देशाला स्वातंत्र्य मिळवले.
ते पुढे म्हणाले, महात्मा गांधी यांनी समता, शांतता, अहिंसा, बंधुत्वाचा मार्ग देशाला दाखला. आज देशाची ओळख जगभरात महात्मा गांधी यांच्यामुळे निर्माण झाली. आजही जगभरात महात्मा गांधी आदर केला जातो, याची पोटदुखी काही विघ्नसंतोषी, जातीयवादी, विद्वेषी मंडळींना आहे. सर्व समाज महात्मा गांधी यांच्या वैचारीक आदर्शावर चालतो, यामुळेच काहींच्या पोटात दुखते. त्यामुळे संभाजी भिडे यांसारख्या प्रवृत्ती अशी विधाने करण्याचे धाडस करतात. राज्य सरकारमधील जातीयवादी आणि मनुवादी विचारांचे लोक संभाजी भिडे यांना संरक्षण देत आहेत. जनता योग्य वेळी त्याचे माप त्यांच्या पदरात टाकेल.
काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सनेर, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, रमेश श्रीखंडे, साबीर शेख, पितांबर महाले, लहू पाटील, भगवान गर्दे, एन. डी. पाटील, अशोक सुडके, योगेश पाटील, पंढरीनाथ पाटील यांसह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रश्नावर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. राज्य शासनाने याबाबत कारवाई करण्याऐवजी शासनातील काही नेते या विषयाचे समर्थन करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.