
Sangamner protest news : संगमनेर इथल्या घुलेवाडीत अखंड हरिनाम सप्ताहामध्ये संग्रामबापू भंडारे महाराज यांनी राजकीय भाष्य करताना दाखवलेल्या उतावळ्यापणावरून चांगलाच राजकीय वाद उफळला आहे. काही नागरिकांनी महाराजांना भर कीर्तनात अभंगावर निरूपण करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला. यावरून कीर्तनात चांगलाच गोंधळ उडाला. यावरून आता संगमनेरमध्ये राजकीय धुरळा उडला आहे.
भाजप हिंदुत्वावादी संघटनांना आज रास्ता रोको आंदोलन पुकारत, त्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेत जोरदार टार्गेट केलं. एकप्रकारे चॅलेंजच दिलं. त्यामुळे हा राजकीय धुरळा आगामी काळात उडतच राहणार असल्याचे दिसते.
आमदार खताळ म्हणाले, "जनतेने शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केलं, हे तुम्हाला सहन होत नाही. म्हणून पगारी बगलबच्चांना पाठवून हिंदुत्वाचा (Hindu) प्रचार-प्रसार करणाऱ्या संग्रामबापू महाराज भंडारे यांच्यावर, हल्ल्याचा प्रयत्न केला. पण यापुढे असे हल्ले सहन केले जाणार नाही. धर्माविरुद्ध आणि सामान्य जनतेवर जर अन्याय कराल, तर आम्ही अजिबात गप्प बसणार नाही."
'तुम्हाला मागेपुढे फिरायला कर्मचारी लागतात. तुम्ही मोकळे जनतेमध्ये जाऊन दाखवा. तु्म्ही पुणे, नाशिक आणि मुंबई (Mumbai) इकडेच फिरा, तुमची संगमनेरकरांना गरज नाही. तुम्ही धर्म सत्तेला भेदण्याचा प्रयत्न करू नका. नाही तर तुम्हाला हिंदुत्ववादी जनता ठोकल्याशिवाय राहणार नाही. संगमनेरकरांनी तुमचा पराभव केला आहे, तो तुम्ही मोठ्या मनाने स्वीकारा', असा सल्लाही आमदार खताळ यांनी थोरातांना दिला.
'आम्हाला धर्माच्या आणि संस्काराच्या गोष्टी शिकू नका. महाराजांनी काय बोलायचे आणि काय नाही बोलायचं, हे तुम्ही सांगू नका. 40 वर्षात तुम्ही काय केलं, याचे तुम्ही आत्मपरीक्षण करा. या तालुक्यातील भीती व दहशत विधानसभेच्या निवडणुकीतच संपली आहे. तुम्ही वेगवेगळ्या कारणाने हिंदुत्ववाद्यांना, त्रास देण्याचे काम करत आहात. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून देवू', असा इशाराही आमदार खताळ यांनी थोरातांना दिला.
महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या कीर्तनकारांवर हात टाकण्याचा कोणी प्रयत्न केल्यास, त्याला जसेच्या तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला. राजकारणासाठी जर कोणी धर्माशी गद्दारी करत असेल, तर ते आम्ही अजिबात सहन करणार नाही, हे राज्य देवाभाऊचे आहे, या राज्यामध्ये हिंदुत्वाच्या विरोधातील एकही शक्ती एकवटू शकणार नाही, असेही तुषार भोसले यांनी म्हटले.
शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे यांनी संगमनेर शहर आणि तालुक्यात संग्रामबापू भंडारे महाजार यांचे कीर्तन ठेवले जाईल, त्यावेळी कोण त्याला विरोध करतो तेच पाहू, असा इशारा दिला. शहर प्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, भाजप तालुध्यक्ष गुलाब भोसले, गोकुळ दिघे, आमदार अमोल खताळे यांच्या पत्नी नीलम खताळ, शहराध्यक्ष पायल ताजणे, रेखा गलांडे रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.