Sangram Jagtap Sangamner Hindu Morcha : अजितदादांच्या शिलेदाराचा 'हिंदुत्वाचा रथ' सुसाट; नोटिशीच्या सूचनेनंतरही संग्राम जगतापांची तोफ धडाडली, 'हिरव्या' सापांना ठेवण्याची भाषा
Sangamner Hindu Morcha : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांचा हिंदुत्वाचा रथ सुसाट निघाला आहे. अजितदादांनी नोटिशीचा सूचक इशारा दिल्यानंतर देखील आमदार जगताप यांची प्रखर हिंदुत्ववादी भूमिका कायम ठेवली आहे.
अहिल्यानगरमधील रविवारच्या जनआक्रोश सभेनंतर आज संगमनेरमध्ये हिंदू सकल मोर्चात सहभागी होत, जोरदार हिंदुत्वावादी भूमिका मांडली. आता उद्या बीड इथं देखील हिंदू जनआक्रोश मोर्चाचं नियोजन आहे. तिथल्या मोर्चात सहभागी होण्याची तयारी आमदार जगतापांनी केली आहे.
संगमनेर (Sangamner) तालुक्यातील घारगाव इथं आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्यावतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात आमदार संग्राम जगताप सहभागी झाले होते. तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ देखील सहभागी होते. या मोर्चात आमदार जगताप यांनी पुन्हा जोरदार भाषण केले.
संग्राम जगताप (Sangram Jagtap) म्हणाले, 'अत्याचाराच्या शंभर केसेसमध्ये शंभर महिला हिंदू सापडतात आणि सर्व आरोपी जिहादी असतात. आपल्यातीलच काही मानसिक 'खतना' झालेले लोक आरोपींना पाठिशी घालतात.' जे हिरवे साप फणा काढतील, त्यांना ठेचण्याची वेळ आली आहे. या लोकांना वेळोवेळी माफ करण्याचे पाप आमच्यासकट अनेकांनी केले. मात्र आता प्रायश्चित करण्याची वेळ आली आहे, असेही आमदार जगताप यांनी म्हटले.
मदरसे तपासण्याची खताळांची मागणी
दरम्यान, शिवसेना आमदार अमोल खताळ यांनी देखील संगमनेर तालुक्यातील अनाधिकृत मदरसे, मशिदी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या धार्मिक स्थळांवर बाहेरून आलेल्या व्यक्तींची ओळखपत्र तपासण्याची मागणी करताना, महिलेवरील अत्याचारातील दोन आरोपींपैकी एक आरोपी सापडत नाही, यातून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर वर शंका येते, असेही आमदार खताळ यांनी म्हटले.
राजकीय खुमखुमी उतरवू
पोलिसांवर दबाव असल्याचे सांगताना, तुमच्यावर कोणाचा राजकीय दबाव असेल, तर आम्हाला सांगा आणि कोणाला खुमखुमी असेल, तर ती खुमखुमी काढायला देवभाऊ पक्का आहे, असा इशारा खताळ यांनी दिला. पुढच्या पंधरा दिवसात संगमनेर तालुक्यातील अनधिकृत मदरसे, मशिदी यांच्यावर कारवाई करा. बाहेरून आलेल्या व्यक्तीची तपासणी झाली पाहिजे. शांत बसलेले काही हिरवे साप पुन्हा वळवळ करायला लागले, त्यांना ठेचायचे देखील आम्हाला चांगल्यापद्धतीने कळत, असा घणाघात अमोल खताळ यांनी केला.
अजितदादांच्या नोटिशीनंतरही...
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्राम जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेवर वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. नोटीस काढत, कारणे विचारली आहेत. या नोटिशीनंतर देखील अजितदादांनी पुढची कठोर कारवाईवर भाष्य केले आहे. असे असले तरी, संग्राम जगताप अजितदादांचे ऐकायला तयार नाही. अहिल्यानगरच्या कालच्या मोर्चानंतर आज संगमनेर इथल्या आजच्या मोर्चात, 'हिरवे साप' म्हणजे, संबंधितांवर सूचक भाष्य केले. आता उद्या बीड इथं मोर्चा आहे. तिथ संग्राम जगताप काय बोलतात, याकडे लक्ष लागलं आहे.
हिंदुत्वाचा रथ सुसाट
संग्राम जगताप यांचा हिंदुत्वाचा रथ सुसाट निघाला आहे. तो पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांना थांबवता येत नसल्याची आता चर्चा आहे. संग्राम जगताप यांना यासाठी नेमकं बळ कोणाचं आहे, अशी चर्चा असताना, पक्षातील जुने-जाणते यावर चर्चा करताना अजितदादांभोवती चर्चा करत आहे. यातच आपली भूमिका घेऊन पुन्हा अजितदादांना भेटणार असल्याचे संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.