Wedding Rules : विवाह सोहळ्यांसाठी नवी आचारसंहिता; रात्री 10 नंतर DJ बंद, 11.30 पर्यंत लॉन्स रिकामे करणे बंधनकारक

Sangamner enforces fixed muhurat, DJ and wedding timing rules : संगमनेर लॉन्स आणि मंगल कार्यालय असोसिएशनचा महत्त्वाचा निर्णय; मुहूर्तावरच विवाह, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या वराती आणि ध्वनिप्रदूषणाला बसणार आळा
Wedding Rules
Wedding RulesSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Wedding News : विवाह सोहळ्यांमध्ये वाढता गोंधळ, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे डीजे, मुहूर्त टळल्यानंतरही चालणाऱ्या वराती आणि त्यामुळे निर्माण होणारा मनस्ताप याला आळा घालण्यासाठी संगमनेरमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापुढे सर्व विवाह सोहळे ठरलेल्या मुहूर्तावरच पार पाडले जाणार असून, कार्यक्रम निश्चित वेळेत पूर्ण करण्याची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) येथे वसंत लॉन्समध्ये शहर पोलिस ठाण्याच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर लॉन्स व मंगल कार्यालय असोसिएशनची बैठक पार पडली. असोसिएशनचे अध्यक्ष गोरख कुटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लॉन्स व मंगल कार्यालय चालक, केटरर्स, पुरोहित, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर, निवेदक आणि संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संतोष पगारे उपस्थित होते. या बैठकीत अभिजित ढोले, सागर नागरे, रोहिदास धुमाळ, वरुण गुंजाळ, प्रीतम जाधव, ओंकार कुटे, राजू कुटे, भाऊ जाखडी आणि कैलास जोशी यांनीही विविध विषयांवर आपली मते मांडली.

'विवाह संस्कारात शिस्तही तितकीच महत्त्वाची'

असोसिएशनचे अध्यक्ष गोरख कुटे यांनी सांगितले की, विवाह हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि मंगल संस्कार आहे. आनंदाच्या या सोहळ्यात वेळेचे नियोजन, शिस्त आणि कायद्याचे पालन तितकेच आवश्यक आहे. ध्वनिप्रदूषण, वाहतूक कोंडी आणि मुहूर्त टळण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी ही आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. यामुळे विवाह सोहळे (Wedding) अधिक नियोजनबद्ध, सुसंस्कृत आणि सर्वांसाठी सुखद होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सर्व संबंधितांनी या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Wedding Rules
Ahilyanagar Estimate Committee Visit : 27 पैकी फक्त 7 आमदार, तरीही बैठकीत अनियमिततांवर बोट; अहिल्यानगरमध्ये आज विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी

या निर्णयामुळे काय बदलणार?

या नव्या नियमांमुळे विवाह सोहळ्यांतील अनावश्यक विलंब, ध्वनिप्रदूषण, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या वराती आणि वाहतूक कोंडी यावर नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच वधू-वर पक्ष, पाहुणे आणि विवाह व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांना वेळेचे नियोजन करणे अधिक सोपे होणार आहे.

Wedding Rules
Sangram Jagtap On Congress : 'गुंगी गुडिया' वादात नवा ट्विस्ट; संग्राम जगताप म्हणाले, 'सुनेत्रा पवारांचे काम दुर्गेच्या रूपात दिसेल'

विवाह सोहळ्यांसाठी लागू होणारे नवे नियम

  • सर्व विवाह सोहळे ठरलेल्या मुहूर्तावरच पार पाडले जातील.

  • रात्री 10 नंतर डीजे किंवा बँड वाजविण्यास परवानगी राहणार नाही.

  • रात्री 11 नंतर छायाचित्रण आणि व्हिडिओचित्रण पूर्णपणे बंद करण्यात येईल.

  • रात्री 11.30 वाजेपर्यंत सर्व लॉन्स आणि मंगल कार्यालये बंद करावी लागतील.

  • विवाह व्यवस्थापनाशी संबंधित सर्व घटकांसाठी स्वतंत्र अंतर्गत नियमावली लागू करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com